आजचे राशीभविष्य | शनिवार | १४ सप्टेंबर २०१९
जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस
मेष- आज तुम्ही जे काही काम कराल त्याचा फायदाच होणार आहे. तुमच्या मनात पैशाच्या दृष्टीकोनातून अनेक विचार येतील. त्यावर तातडीने विचार करा. फिरण्यासाठी चांगला वेळ आहे.
वृषभ- आज तुम्ही धीराने काम कराल. एखादं नवं काम करण्याची इच्छा होईल. दैनंदिन कामांमध्ये जास्त वेळ जाईल. पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे चांगला वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.
मिथुन- एखादं महत्त्वपूर्ण काम पूर्णत्वास नेऊ शकता. तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. पूर्ण मेहनत कराल. इतरांना मागे टाकायची इच्छा होईल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
कर्क- नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याची शक्यता आहे. उत्साह परमोच्च शिखरावर असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मताशी अनेकजण सहमत असतील.
सिंह- तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही अशा गोष्टी समोर य़ेतील ज्या येत्या दिवसांमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतील. नवा करार फायद्याचा ठरेल, दिवस शुभ आहे. नशीबाची साथ आहे.
कन्या- नोकरीच्या ठिकाणी नव्या गोष्टी सुरु कराल. कामाच्या व्यापात नवा प्रयोग कराल. जुनी कामं वेळेवर पूर्ण होतील. कौटुंबिक सुख मिळेल.
तुळ- विचाराधीन जुनी कामं पूर्ण कराल. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. मित्रांसमवेत चांगला वेळ व्यतीत होईल. उधार दिलेले पैसे परत मिळतील.
वृश्चिक- आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो.
धनु- अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. मित्रांची मदत मिळेल. कोणा एका व्यक्तीशी झालेल्या मतभेदांना मागे टाकण्याचा प्रयत्न करा.
मकर- धनलाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी चालणाऱ्या कामांचा फायदा होईल. आज तुम्ही स्वत:ला बऱ्याच अंशी सिद्ध कराल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे.
कुंभ- जुने प्रश्न मार्गी लागतील. स्वत:ची काळजी घ्या. नव्या कपड्यांची खरेदी कराल. सक्रियतेचा स्तर वाढेल. यशप्राप्तीसाठी धीर ठेवा.
मीन- कामाच्या ठिकाणी तुमची जबाबदारी वाढेल. तुम्ही बऱ्याच अंशी यशस्वी ठराल. प्रवासयोग आहे. बरेच बेत आखाल. अडचणींवर मात करण्याची तयारी कराल.