आजचे राशीभविष्य : `या` राशींच्या लोकांना धनलाभ
असा असेल आजचा दिवस
मेष : कामासोबतच आज तुमची जबाबदारी वाढेल. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायातील काही महत्वाचे निर्णय अगदी समजुतदारप्रमाणे घ्या. अनेकबाबतीत आज तुम्ही यशस्वी असाल.
वृषभ : जुने सर्व त्रास आज संपतील. स्वतःकडे लक्ष द्या. आजचा खरेदीचा दिवस आहे. समाज आणि कुटुंबात दोन्हीकडे आज लक्ष द्या. खर्चांकडे लक्ष द्या. कामात यश मिळेल.
मिथुन : धन लाभ होऊ शकतो. अशी काम करा ज्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. अनेक प्रकारचे विचार आणि योजना आज कराल. अविवाहित लोकांना लग्नाचा शुभकाळ आहे.
कर्क - अचानक धन लाभ होऊ शकतो. कुठे अडकलेले पैसे असतील तर ते तुम्हाला मिळतील. पैशांच्या समस्या दूर होतील. कुटुंबाकडून तुम्हाला कठीण प्रसंगातून बाहेर काढण्यात मदत मिळेल. कुणाही अनोळख्या व्यक्तीवर लगेच विश्वास टाकू नका.
सिंह : आर्थिक परिस्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. महत्वाकांक्षा मोठी असेल त्यामुळे त्याच दृष्टीकोनातून प्रयत्न करा. ऑफिसमध्ये तणावाचं वातावरण असेल. मेहनतीचा दिवस असेल.
कन्या : ऑफिस किंवा व्यवसायात नवीन काहीतरी कराल. नवीन प्रयोग दोन्हीकडे फायदेशीर असेल. आज तुम्ही कोणत्याही गोष्टीत विचार कराल तेथे तुम्हाला यश मिळेल. अनुभवी व्यक्तींकडून कौतुक होईल.
तूळ : विचार केलेली जुनी सर्व कामं होतील. फायदा देखील होऊ शकतो. सर्व काम मार्गी लागल्यामुळे आनंदी असाल. मित्र परिवारासोबत वेळ घालवाल. नवीन योजनांचा विचार कराल.
वृश्चिक : तुमच्यासाठी आजचा दिवस खास असेल. काही अशा गोष्टी समोर येतील ज्या आगामी काळात तुम्हाला फायदेशीर असतील. समजुतदारपणे वागा. अनेक दिवसांपासून जो त्रास होत असेल तो देखील बरा होईल.
मकर : काही महत्वाची काम आज पूर्ण कराल. ज्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होईल. मेहनत घ्या अधिक लाभ होईल. नवीन काही गोष्टी सुरू करण्यापेक्षा जुन्या गोष्टींकडे लक्ष द्या
कुंभ : आज धैर्याने काम करा. दिवसभर फक्त पैशाचा विचार कराल. जागा आणि नवीन प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक कराल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस महत्वाचा.
मीन : आज तुम्ही जे काही काम कराल त्याने तुम्हाला फायदा होईल. कामकाजातून तुम्हाला पैसे मिळतील. मनातील पैशासंदर्भात अनेक विचार येईल. आजचा दिवस महिलांसाठी खास असेल.