आजचे राशीभविष्य : `या` राशींकरता आजचा दिवस खास
पहिल्या पाच राशींसाठी महत्वाचा दिवस
मेष - तुम्ही कायम शांत स्वभावाचे असता पण आज तसं होणार नाही. तुम्ही आज पटत नसलेल्या गोष्टीवर रिऍक्ट व्हाल. स्पष्ट पण परखडपणे बोलाल. आज थोडं इतरांच्या मनाविरूद्ध जाऊन निर्णय घ्याल. जो निर्णय तुमच्यासह इतरांसाठी खास असेल.
वृषभ - या राशीच्या लोकांनी पैशाची बचत करणं गरजेचं आहे. आर्थिक अडचण जाणवेल ती वाढण्याअगोदरच तरतूद करा. पण चिंता करू नका. खर्च आटोक्यात राहतील. फक्त योग्य नियोजनाची गरज आहे.
मिथुन - नोकरी आणि व्यवसायासंबंधी महत्वाचा निर्णय घ्याल. नवीन व्यक्तीला कामात सहभागी करून घ्याल. आज स्वतःचे निर्णय स्वतः घ्या कुणावरही अवलंबून राहू नका. कामाचा दिवस आहे. आरोग्य सांभाळा.
कर्क - आज एकावेळी एकच गोष्ट करा. मल्टीटास्क करावा लागेल. पण थोडं जपून. कामात सहकाऱ्यांची मदत घ्याल. आरोग्य सांभाळा. कामाचा ताण आहे. प्रिय व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवाल.
सिंह - आजचा दिवस खास असेल. तुम्ही दिवसभर सतर्क असाल त्यामुळे कामातील खाचखळगे अतिशय स्पष्टपणे पाहू शकाल. महत्वाचं म्हणजे आजचा दिवस जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे तो असाही खास होणार आहे.
कन्या - जुन्या गोष्टीकडे स्वतःला आकर्षित होताना पाहाल. एका व्यक्तीमुळे जुन्या सर्व गोष्टी पुन्हा ताज्या होतील. कामाच्या ठिकाणी थोडा आराम असेल. त्यामुळे मनातून एक शांतता अनुभवाल. स्वतःसाठी फक्त स्वतःसाठी वेळ घालवाल.
तूळ - स्वप्नांचा विचार कराल. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून केलेले प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. जवळच्या प्रिय व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम घालवाल. यामुले कामाचा ताण तरी जाईलच पण पुढच्या कामांसाठी सज्ज व्हाल.
वृश्चिक - जोडीदाराची कमतरता जाणवेल. म्हणून घाई करू नका. प्रेमात पडण्यासाठी घाई करू नका. काही नाती हळूवार समोर येतील. त्याचा आनंद वेगळा असेल. या सगळ्या भावनांसोबत थोडा वेळ कामात जाईल. आरोग्य सांभाळा. मनस्थिती सांभाळा.
धनू - आज तुम्हाला अनुशासनची गरज आहे. मग ते अनुशासन कामाप्रती किंवा सवयींकरता का असेना पण ते लावणं गरजेचं आहे. नियमाने जगणं काहीरित्या चांगल असतं. आर्थिक बाबी सांभाळा.
मकर - प्रेमात असाल तर आज जरा सावधान वाद होण्याची शक्यता आहे. नवीन लग्न झाल्यांनी देखील याची काळजी घ्याल. वृद्धांच्या आरोग्यात जरा चढ-उतार जाणवेल. लहान मुलांकडून कळत नकळत अनेक गोष्टी शिकतील.
कुंभ - आज अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. पण सगळ्यागोष्टी थोड्यावेळाने सुरळीत होतील. त्यामुळे ताण घेऊ नका. पण लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करा. कामात चोख रहा. संध्याकाळनंतर आनंदी दिवस आहे.
मीन - कुटुंबात अतिशय चांगला वेळ घालवाल. काही गोष्टींचा ताण वाटेल पण तुमचा सकारात्मक विचार त्या गोष्टी सहज सोप्या करेल. काही लोकांकडे दुर्लक्ष करण्यातच खरा शहाणपण आहे. कामात आनंद मिळेल.