मेष- अधिकाधिक मेहनत करावी लागेल. संतानसुख मिळण्याचा योग आहे. धनलाभ  होण्याचीही शक्यता आहे. अतिउत्साहीपणा करु नका. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नव्या कामाची सुरुवात करु नका. भावनांवर नियंत्रण ठेवा. आरोग्याचीही काळजी घ्या. प्रवासाचा योग आहे. 


मिथुन- एखादा लहानसा प्रवासही तुम्हाला आनंद देणारा ठरु शकतो. नव्या संधी मिळतील त्यावर लक्ष ठेवा. खर्चांवर नियंत्रण ठेवा. 


कर्क- करिअरमध्ये काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. नातेसंबंधांवर लक्ष ठेवा. शांततेने पावलं उचला. 


सिंह- मनस्थिती चांगली असेल. कुटुंबातील ताणतणाव कमी होईल. संतानसुख मिळेल. सोबतच एखादी शुभवार्ताही मिळेल. 


कन्या- एखादं महत्त्वाचं काम टाळाल. पण, याचाच फायदा होणार आहे. इतरांच्या कामाच हस्तक्षेप करु नका. तुमच्याकडून दान होणार आहे. 


तुळ- एखाद्या मोठ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या पदावर तुमची नियुक्ती होऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्याची काळजी घ्या. 


वृश्चिक- तणाव कमी असेल. एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग आहे. महत्त्वाच्या कामांमध्ये साथीदाराची हजेरी असेल. 


धनु- करिअरमध्ये यश मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. 


मकर- आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा करु नका. धन-संपत्ती सांभाळा. एखादी गोष्ट दान करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. 



कुंभ- दाम्पत्य जीवनात आनंद मिळेल. इतरांची काळजी करु नका. जसं प्रामाणिकपणे काम करता तसंच काम करत राहा. 


मीन- करिअरच्या दृष्टीने असणाऱ्या काही समस्या दूर होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवा.