आजचे राशीभविष्य | मंगळवार | ६ ऑगस्ट २०१९
....असा आहे तुमचा आजचा दिवस
मेष- आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी आणि व्यवसायामध्ये निर्धारित लक्ष्यावर एकाग्र राहा. कामं लवकरात लवकर आटोपण्याचा प्रयत्न करा. नव्या व्यक्तींना भेटण्याची आणि त्यांच्याशी मैत्री होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत जास्तीत जास्त वेळ व्यतीत कराल. मन आणि बुद्धीवर ताबा ठेवा.
वृषभ- काही नव्या संधी समोर येतील. तुम्ही आखलेल्य़ा बेतांना इतरांचा दुजोरा मिळेल. व्यवसायामध्ये यश मिळेल. नशिबाची साथ तुम्हाला लाभेल. सकारात्मक राहा. प्रेमाच्या नात्यात साथीदाराप्रती जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. शांत राहा.
मिथुन- नव्या व्यवसाय, नोकरी किंवा अशा काही प्रकारचे प्रस्ताव मिळतील. विचाराधीन कामं पूर्ण होतील. नव्या कामाची सुरुवात करु शकता. आज तुम्ही उत्साही असाल. हळूहळू तुम्हाला यश मिळेल. स्वत:च्या कामावर लक्ष द्या. आज तुम्ही तेच कराल जी तुमची इच्छा असेल.
कर्क- जुन्या कामांचा फायदा होऊ शकतो. एखादा जुना मित्र तुमची मदत करेल. धार्मिक यात्रेनिमित्त एखाद्या प्रवासाला जाल. आज कमी मेहनत करावी लागेल. आर्थिक बाबतीत काही महत्त्वाची पावलं उचलाल.
सिंह- बुद्धिचातुर्याने आज बऱ्याच गोष्टी सांभाळाल. नोकरदार वर्गाला इतरांची मदत मिळेल. पुढे जाण्याची संधी आहे. जे काम तुमच्या वाट्याला येईल ते पूर्ण कराल, सोबतच काही जादाची जबाबदारीही मिळेल. इतरांच्या समस्यांवर तोडगा काढल्यामुळे येत्याकाही दिवसांमध्ये तुम्हाला या साऱ्याचा फायदा होणार आहे.
कन्या- पुढे जाण्याची संधी मिळेल. ज्यांच्याशी संवाद साधाल त्यांना तुमचे विचार पटतील. कुटुंबासमोर एखाद्या महत्त्वाच्या बाबतीतील निर्णय ठेवाल. व्यवसायामध्ये काही बदल करण्याचा बेत आखाल.
तुळ- व्यग्र राहाल. शांततेने काम करा. इतरांचं म्हणणं गांभीर्याने ऐका. कागदोपत्री कामांवर लक्ष द्या. कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटेल. जबाबदारी वाढू शकेल.
वृश्चिक- एखाद्या वादावर आज तुम्ही तोडगा काढाल. यामध्ये तुम्हाला यशही अगदी सहज मिळणार आहे. जुन्या गोष्टी दूर सारत पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आहे.
धनु- एखाद्या महत्त्वाच्या कामात मित्रांची मदत लाभेल. महत्त्वपूर्ण कामांवर चर्चेची संधी मिळेल. याचा पूर्ण फायदा घ्या. दिनचर्येत काही बदल करावे लागतील. साथीदारासोबतचे संबंध आणखी दृढ होतील.
मकर- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. जास्तीत जास्त अडचणींवर मात कराल. गुंतागुंतीच्या परिस्थितीविषयी एखाद्या व्यकीशी संवाद साधा, तोडगा निघेल. काही बाबतीत नव्या संधी मिळतील.
कुंभ- एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीला भेटण्याचा योग आहे. वरिष्ठांची मदत होईल. आर्थिक व्यवहारांचा गांभीर्याने विचार कराल. कामाप्रती असणाऱ्या एकाग्रतेत खंड पडून ,देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी एखादं नवं काम तुम्हाला दिलं जाईल. जुन्या वादांवर तोडगा निघेल.
मीन- जास्तीत जास्त कामं पूर्ण होतील. त्यांचा तुम्हाला फायदाच आहे. मित्रांसमवेत एखादा बेत आखाल. व्यवसायामध्ये नव्या संधी मिळतील. पण, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेऊनच महत्त्वाचे निर्णय घ्या. एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील माहिती मिळेल.