आजचे राशीभविष्य | गुरुवार | ८ ऑगस्ट २०१९
जाणून घ्या कसा आहे तुमचा आजचा दिवस
मेष - मित्र आणि भावंडांचं सहकार्य लाभेल. नवी आणि विचाराधीन कामं पूर्ण होतील. संपत्तीच्या कामांवर लक्ष द्याल. तुमचा पराक्रम वाढेल. आजचा दिवस चांगला व्यतीत होईल. जबाबदाऱ्या पूर्ण होतील. साथीदारासाठी वेळ काढा. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ- कोणा एका नकारात्मक गोष्टीत अडकलात तर महत्त्वाची संधी गमावून बसाल. आज कोणताही निर्णय घेऊ नका. कोणताही विषय निकाली काढू नका. दिवसभर सावध राहा. इतरांचं म्हणणं ऐका.
मिथुन- व्यापाराच्या बाबतील नवे करार समोर येतील. अडचणींना तोंड देण्याच्या बाबतीत आजचा दिवस चांगला असेल. विचाराधीन कामं सुरु करा. अनेक अडचणींवर तोडगा निघेल.
कर्क- प्रेमसंबंधांमध्ये काही गैरसमज होऊ शकतात. कोणत्याही बाबतीत बेजबाबदारपणा करु नका. कोणत्याही बाबतीत घाई करु नका. आज कोणत्याही बाबतीत जास्त मेहनत करावी लागते.
सिंह- विचाराधीन कामं पूर्ण होणार नाहीत. तुम्ही अनेक विचारांमध्ये गुंतवाल. कोणाशीही कटूतेने वागू नका. सांभाळून राहा. आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला आहे.
कन्या- बिजनेसमध्ये अनेक नव्या योजनांवर बेत आखाल. प्रेमसंबंधांसाठी वेळ आणि दिवस चांगला आहे. आज विचाराधीन कामं पूर्ण होतील. आज काम करण्यावर भर द्या. धैर्य ठेवा. मन प्रसन्न असेल.
तुळ- आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. परिस्थितीचा फायदा आहे. आज तुम्हाला काही चांगल्या संधी मिळतील. आज आरोग्य चांगलं असेल.
वृश्चिक- नोकरी आणि व्यापारामध्ये अचानकत काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. नुकसानही होऊ शकतं. गुंतागुंत वाढेल. अडचणीत आणणाकी माणसं आज आजुबाजूलाच असतील. आरोग्यात चढ उतार जाणवेल.
धनु- आर्थिक अडचणी दूर होतील. दाम्पत्य जीवन सुखी असेल. विनम्र स्वभावाने अनेक गोष्टींवर तोडगा काढाल. नव्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या.
मकर- आज दिवसभर सावध राहा. अनेकजण त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या वाटेत अडचणी निर्माण करु शकता. तुमच्या मनात प्रचंड उलथापालथ असेल. काही अपूर्ण कामं पूर्ण करावी लागतील. आरोग्याच्या बाबतीत दिवस ठिक असेल.
कुंभ- नोकरीच्या ठिकाणी स्वत:वर ताबा ठेवा. अडचणी दूर होतील. तुम्ही आखलेले बेत यशस्वी ठरतील. पुढच्या कामांचे बेत आखणं तुमच्यासाठी सोपं असेल. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मीन- व्यवसायामध्ये काही चांगलं करु इच्छित असाल तर अडचणींना तोंड द्यावं लागेल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये घाई करु नका. तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये अडचणी असतील. जेवण वेळेवर करा.