मेष : आर्थिक प्रकरणांमध्ये समजदारी दाखवा. जोडीदाराचा सल्ल्ला घेतल्यास फायदेशीर ठरेल. पैसे कमावण्याची योजना बनवाल. नोकरीमध्ये चांगली ऑफर मिळेल. काही मित्रांच्या भेटीगाठी होतील. ज्यांच्याशी तुम्ही भविष्यातील काही प्लानिंग कराल. तुमच्या डोक्यात सतत प्लानिंग सुरू राहील. ऑफिसमध्ये सहकार्यांची मदत मिळेल. तुमचा सल्ला घेतलेल्यांना फायदा होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ : चांगले प्लानिंग आणि विचाराचा उपयोग केल्याने मोठा फायदा मिळेल. ठरवलेले काही खास काम पूर्ण करण्याचा योग बनवाल. तुमचे दैनंदिन काम किंवा नोकरीत काही बदल करण्याचा विचार कराल. खरेदी फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. 


मिथून : आज तुम्ही नवे प्रयोग कराल. तुमच्या आत्मविश्वास आज वाढू शकले. मनाचं ऐका. प्रत्येक प्रकारच्या संबंधात सहजता येईल. लोकांशी तुमचा ताळमेळ राहील. रोमांसचे क्षण मिळतील. परिवार किंवा मित्रांशी फिरण्याचा योग येईल. 


कर्क : आज तुम्ही प्रयत्न कराल तर चांगले यश मिळेल. आज तुम्ही कोणालाही तुमचे सांगणे पटवून देवू शकता. घरातील काही प्रकरणे अचानक तुमच्या समोर येतील. थोडा वेळ एकट्याने घालवा. तुमच्यासाठी चांगले असेल. समजदारी दाखवूनच घरातून बाहेर पडा. ऑफिस किंवा तुमच्या क्षेत्रात थोड संभाळून घ्याव लागेल. जे येणाऱ्या दिवसांत तुमच्या बाजूने असेल


सिंह : आज तुम्ही तुमचे काम पूर्ण करुन घेण्यास अनेक मार्ग वापराल. व्यस्त असाल तरीही दिवस चांगला जाईल. पैशांच्या प्रकरणातही तुम्हाला फायदा होईल. नोकरी देखील तुम्हाला मिळू शकते.  अनेक जण तुमच्यासाठी पॉझीटीव्ह असतील. परिवारातील लहानग्यांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्र किंवा व्यवसायात धनलाभ होईल. पदोन्नती सोबत सन्मान मिळू शकतो. 


कन्या : ऑफिमधल्या कामात तुम्हाला यश मिळेल. करियरशी संबंधित प्रश्न आज सुटण्याची चिन्हे आहेत. तुम्ही त्रस्त होऊ नका. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतूक होईल. गिफ्ट किंवा प्रमोशन मिळू शकतं. नव्या मित्रांशी ओळख होईल. व्यवसाय करणाऱ्यांना अडकलेला पैसा परत मिळेल. अधिकारी तुमच्या कामाने खुश होतील. 


तुळ : स्वत:वर विश्वास ठेवा. मेहनत करा. माहिती एकत्र करा. लोकांना भेटा आणि वेळ आली तर प्रवास देखील करा. तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल होऊ शकतो. काही नवे अनुभव मिळू शकतील. आज तुम्ही खुल्या मनाने आणि उत्साहाने काम कराल. तुमच्या राहणीमानातही बदल होऊ शकतो. 


वृश्चिक : ऑफिसमध्ये जास्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. नवे काम करण्याचे मनं होईल. दुसऱ्याचे सांगणे लक्षपुर्वक ऐका. सकारात्मक राहा. काम जास्त नसेल. दिवस लवकर निघून जाईल. ऑफिसमध्ये आलेल्या अडचणी संपतील. तुमच्या आयुष्यात प्रभाव टाकतील अशा मंडळींशी तुमची ओळख होईल. पैशांशी संबंधित प्रकरणे तुमच्या पद्धतीने सोडवा. 


धनु : जास्तीत जास्त समस्या सोडवण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. कोणती तरी मोठी गुंतवणूक केली असेल तर त्यातून तुम्हाला फायदा मिळू शकतो. पैसा गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. जास्त गुंतवणूक करताना मोठ्यांचा सल्ला घ्या. दिवस लवकर निघून जाईल. काही नवीन आणि मजेशीर लोकांशी भेटीगाठी होतील. नोकरी किंवा व्यवसायात काही बदल करण्याचा विचार कराल.


मकर : खूप धैर्य आणि सातत्य दाखवत केलेल्या मेहनतीचा परिणाम तुमच्या बाजूने दिसेल. जुन्या मित्रांशी ओळख होईल किंवा निर्णय तुमच्या बाजूने लागतील. तुमच्या जबाबदारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. विचार केलेली कामे पूर्ण कराल. लोकांचे लक्ष तुमच्यावर असेल. ऑफिसमध्ये कोणतीतरी नवी गोष्ट तुम्हाला शिकायला मिळेल. 


कुंभ : काही बदल घडण्यास सुरूवात होईल. रहस्यपूर्ण घटनांकडे तुमचा कल वाढेल. चांगला व्यवहार तुम्हाला यशस्वी बनवेलच. त्यासोबत तुम्हाला भेटलेली माणसे आनंदी असतील. जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाल. तुमची धारणा सकारात्मक ठेवा. 


मीन : चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतात. नवे प्लानिंग आणि संधी मिळण्यासाठी मोठा निर्णय घेऊ शकता. नोकरीमध्ये नवे पद किंवा नवी ऑफर मिळू शकते. धन लाभ होईल. पैसा कमावण्याचा नवा मार्ग सापडेल. मोठी समस्या सुटेल. तुम्हाला कोणतातरी प्रवास करावा लागू शकतो. दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष द्या. आपल्या कामातून सर्वांना आनंदी करण्याचा प्रयत्न कराल. 


- दीपक शुक्ला