मेष- नोकरी आणि व्यवसायात चालढकल करू नका. समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील व्यक्तींसोबत चांगला वेळ व्यतीत करता येईल. कुटुंबीयांच्या मदतीने आर्थिक समस्या सुटतील. मनावर ताबा ठेवा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- नव्या संधी चालून येतील. नोकरीत तुमचा एखादा प्रस्ताव मान्य केला जाऊ शकतो. व्यवसायातही नशीबाची चांगली साथ मिळेल. जोडीदारामुळे जबाबदारी वाढेल. 


मिथुन- नोकरी आणि व्यवसायात नव्या संधी चालून येतील. नियोजित कामे मार्गी लागतील. एखाद्या नव्या कामाला सुरुवात करण्यासाठी उत्साही असाल. यश मिळण्यासाठी वेळ लागेल. 


कर्क- एखादे पूर्वी केलेले काम फायदेशीर ठरेल. एखादा जुना मित्र मदतीला येईल. एखादी समस्या सतावत असेल तर त्यासंबंधी महत्त्वाची बातमी कानावर येईल. जोडीदाराकडून चांगले सहकार्य लाभेल. 


सिंह- नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल. नव्या जबाबदाऱ्या अंगावर पडतील, त्यामुळे कामाचा व्याप वाढेल. काहीजण स्वत:ची व्यथा तुमच्यासमोर मांडतील. त्यांची मदत करणे भविष्यात फायदेशीर ठरेल. 


कन्या- प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. आपला प्रस्ताव इतरांच्या गळी उतरवण्यात यशस्वी ठराल. व्यवसायात नवे निर्णय घेण्याचा विचार कराल. विवाहोच्छुक लोकांना लग्नाचा एखादा प्रस्ताव येईल.


तूळ- कामाचा व्याप वाढेल. मात्र, इतरांचे बोलणे ऐकून घ्यावे लागेल. चित्त शांत ठेवून काम करण्याची गरज. प्रिय व्यक्ती लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. प्रेमीयुगुलांना मनातील भावना सांगण्यासाठी चांगला दिवस. 


वृश्चिक- एखादा जुना वाद किंवा प्रकरण मार्गी लागेल. काही घटनांमुळे तुमचा दृष्टीकोन बदलण्याची शक्यता. आर्थिक आवक वाढेल. नोकरी आणि व्यवसायात एखादे मोठे यश मिळण्याची शक्यता. 


धनु- एखादा मित्र मदतीला धावून येईल. महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठीभेटी होतील. याचा फायदा घ्या. मित्रांची मदत मिळाल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. 


मकर- आजचे ग्रहमान अनुकुल राहील. समस्या सोडवण्यात यशस्वी ठराल. आर्थिक आवक वाढवण्यासाठी नव्या संधी चालून येतील. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या.


कुंभ- एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घ्याल. अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. सामंजस्याने प्रश्न हाताळा. लक्ष विचलित होऊन देऊ नका. नोकरीत एखादी जबाबदारी पेलण्यासाठी तयार राहा. 


मीन- नियोजित काम ठरवल्याप्रमाणे पार पडतील. मित्रांसोबत एखादा प्लॅन आखाल. एखादा मोठा निर्णय घ्याल. व्यवसायात नव्या संधी चालून येतील. ज्येष्ठांचा सल्ला फायदेशीर ठरेल.