आजचे राशीभविष्य | सोमवार | ४ मार्च २०१९
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष- परिस्थिती पाहता कामाचे बेत आखाल तर फायद्याचं ठरेल. मित्रांची मदत मिळेल. जुन्या मित्रांशी संपर्क होऊ शकतो. धनलाभ होण्याची शक्यता. साथीदारासोबत भटकंतीला जाण्याचे बेत आखू शकाल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येण्याची शक्यता.
वृषभ- नशीबाची साथ आहे. अडकलेली कामं पूर्ण होतील. बऱ्याच काळापासून विचारात असणारी कामं पूर्णत्वास न्याल. पगारवाढ होण्याची चिन्हं. प्रेमसंबंधांमध्ये एकदुसऱ्याची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करा. धार्मिक स्थळांना भेट देण्याची उच्छा होईल.
मिथुन - मित्रांच्या साथीने काही सकारात्मक कामं कराल. पण, यासाठी आधी प्रयत्न करावे लागतील. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता आहे. जवळपास सर्व कामं पूर्ण होतील. तुमच्या कामाची पद्धत उतरांना प्रभावित करेल.
कर्क- करिअरमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता. प्रयत्नांना यश मिळेल. जवळच्या व्यक्तींसाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. साथीदारासोबतच्या नात्यात सुधारणा होईल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, फायदा होईल.
सिंह- नव्या संधी मिळतील. दैनंदिन कामं सहज पूर्ण होतील. आजच्या कामांमध्ये प्रगती होईल. कुटुंब आणि सोबतच्या व्यक्तींमध्ये तुमची चांगली प्रतिमा होईल.
कन्या- अडचणींमध्ये असाल तर काहीशी उसंत मिळेल. बचत करण्यात यशस्वी व्हाल. प्रयत्नांच्या बळावर अडकलेली कामं पूर्ण कराल. कुटुंब आणि समाजात वावरताना कठिण परिस्थिती उदभवली तर, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील.
तुळ- अचानक धनलाभ होण्याची शक्यता. जवळच्या व्यक्तींशी असणारे संबंध सुधारण्याची शक्यता. करिअरमध्ये नव्या वाटा खुलण्याची शक्यता. दिवस चांगला असेल.
वृश्चिक- मोठ्या धाडसाने महत्त्वाची कामं सुरू कराल. यश मिळेल, पण काही गोष्टींचा त्याग करावा लागेल. काही गुप्त माहिती कळेल. कामकाज पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.
धनु- फायद्याचा काळ आहे. आज सर्व व्यवहार पूर्ण करा. ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करा. दिनचर्येत सुधार येईल. काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच बाबतीत यशस्वी व्हाल. अडचणी दूर होतील.
मकर- घरी जास्त वेळ द्यावा लागेल. गरज पडल्यास कुटुंबासाठी काही गोष्टींचा त्यागही करावा लागेल. दिवस चांगला व्यतीत होईल. आरोग्य चांगले राहील. एखादी अशी गोष्ट समोर येईल ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या फायद्यांचे संकेत मिळतील. एखाद्या प्रकरणाविषयी गांभीर्याने विचार करा.
कुंभ- जुन्या अडचणी दूर होतील. मुलंबाळं, कुटुंब या साऱ्याच्या बाबतीत काही चांगले बदल घडतील. जवळच्या व्यक्तींशी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा कराल. आर्थिक फायदा होईल. तितकीच गुंतवणूक करा, जितकी करणं शक्य आहे. व्यापाराच्या बाबतीत ग्रहतारे त्यांचा परिणाम दाखवतील.
मीन- कोणत्याती पूर्वतयारीशिवाय काम पूर्णत्वास जाईल. नात्यांमध्ये अचानक बदल येतील. मनातल्या गोष्टी व्यक्त करत इतरांची मनधरणी करण्याचा काळ आहे. स्वत:साठीच्या संधी मिळवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबाचं सहकार्य मिळेल.