आजचे राशीभविष्य | शनिवार | २३ मार्च २०१९
कसा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी, व्यवसायातील टार्गेटवर संपूर्ण लक्ष द्या. एकाग्रतेने काम करण्याचा प्रयत्न करा. नवीन लोकांशी भेट किंवा मैत्री होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही जणांशी तुमच्या कामाबाबत, प्लॅनिंगबद्दल शेअर करू शकता. कुटुंबियांसोबत वेळ चांगला जाईल. कुटुंबियांच्या मदतीने आर्थिक समस्या सोडवू शकाल. मन आणि मेंदू शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
वृषभ - काही नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या योजनांना समर्थन मिळू शकते. व्यवसायात यश मिळेल. नशीबाची साथ मिळेल. सकारात्मक राहा. साथीदाराबाबत जबाबदारी वाढू शकते. शांत राहा. नवीन लोकांशी ओळखी झाल्यास यश मिळू शकेल.
मिथुन - नवीन व्यवसाय, नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. विचार केलेली कामं पूर्ण होऊ शकतात. उत्साही राहाल. हळू-हळू यश मिळेल. रखडलेल्या कामांवर काम करण्याचा प्रयत्न करा. आपल्या कामावर लक्ष द्या. आज मनात येईल तेच काम कराल.
कर्क - आधी केलेल्या कामांचा फायदा होईल. जुन्या मित्रांचा अचानक फायदा होऊ शकतो. धार्मिक यात्रेसाठी योजना आखू शकता. महत्त्वाची कामं आज उरकून घ्या. पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रयत्नांत साथीदाराची साथ मिळेल.
सिंह - आपल्या बुद्धीने परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न कराल. नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल. प्रगती होईल. जे काम दिलं जाईल ते पूर्ण कराल. अधिक जबाबदारी पडेल.
कन्या - कामासंबंधी नवीन संधी मिळतील. कौटुंबिक बाबींमध्ये स्वत:चे मत स्पष्टपणे मांडा. एखाद्या खास कामाबाबत नवीन विचार येतील. विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.
तुळ - व्यस्त राहाल. मन शांत ठेऊन काम करा. दुसऱ्यांचे बोलणे गंभीरतेने ऐका. साथीदारासोबत तुमच्या मनातील गोष्ट शेअर करा. कागदपत्रांसंबंधी कामकाजावर लक्ष द्या. कामं पूर्ण होतील. जबाबदारी वाढेल.
वृश्चिक - दिवस चांगला आहे. सकारात्मक राहाल. पैशांसंबंधी फायदा होण्याची शक्यता आहे. कामात नवीन संधी मिळेल. एखादा जुना वाद सोडवण्याचा प्रयत्न कराल. जुन्या गोष्टी सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
धनु - एखाद्या खास कामात मित्रांची मदत मिळेल. महत्त्वपूर्ण गोष्टींवर लोकांशी बोलण्याची संधी मिळेल. याचा पूर्ण फायदा करून घ्या. दररोजच्या कामात काही बदल करावे लागू शकतात. काही गोष्टींचा दबाव कमी होईल. साथीदारासोबत संबंधांत सुधारणा होईल. साथीदाराची साथ मिळेल.
मकर - दिवस चांगला आहे. आज अधिकतर समस्या मार्गी लागतील. पैशांच्या स्थितीवर गंभीरतेने लक्ष द्या. एखाद्या समस्येवर काही लोकांशी चर्चा केल्यास मार्ग मिळेल. पैशांसंबंधी नवीन संधी मिळतील. कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा.
कुंभ - महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होण्याचा योग आहे. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. कामात एकाग्रता ठेवा. ऑफिसमध्ये नवीन काम दिले जाऊ शकते. प्रवासाचा योग आहे. जुना वाद संपू शकतो. मुलं आणि शिक्षणाकडे तुमचे लक्ष असेल.
मीन - कामं पूर्ण होतील. फायदा होईल. मित्रांसोबत एखादा कार्यक्रम होऊ शकतो. एखादा मोठा निर्णय आज घेऊ शकता. काही गोष्टींमध्ये अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन निर्णय घ्या. विचार करत असलेल्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील.