आजचे राशीभविष्य | शनिवार | 9 फेब्रुवारी 2019
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : नोकरी करणाऱ्या सहकाऱ्यांची मदत मिळेल. आज खूप काम करावे लागेल. पण कामामुळे घाबरू नका. जोडीदाराकडून प्रेम आणि सुख मिळण्याचे योग आहेत. धन लाभ होण्याचे योग आहेत. अडकलेली प्रकरणे मिटतील. गुंतवणूक करण्याचे योग आहेत. नवे घर घेण्याचा विचार कराल. धार्मिक प्रवास होईल. कोणती तरी चांगली संधी मिळू शकते. आरोग्यात सुधार पाहायला मिळेल.
वृषभ : व्यवसाय ठिक चालेल. गेलेले पैसे परत मिळू शकतात. जमीनीच्या प्रकरणात फायदा होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. कर्जातून मुक्त होण्यासाठी मदत आणि मार्ग सापडेल. पैशांशी संबंधी प्रकरणी विचार करावा लागेल. वडीलांकडून मदत मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल.
मिथून : दुहेरी विचार असल्याने कामात मन लागणार नाही. खास प्रकरणात निर्णय घेणे कठीण होऊन जाईल. पण काळजी करायचे कारण नाही. वादात पडण्यापासून दूर राहा. कामात एकाग्रता नसल्याने त्रस्त व्हाल. विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. खर्च देखील जास्त होऊ शकतो. वायफळ खर्च वाढू शकतो. पोटाचे आजार आणि मानसिक तणावात राहाल.
कर्क : नशीब आणि वेळ तुमच्या बाजूने आहे. आज कोणत्याही कामात फेरबदल झाल्यास फायदा तुम्हालाच होणार आहे. जुनी काम संपवून नवी सुरूवात करण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमची महत्त्वाची कामे देखील पूर्ण होतील. जोखिम असलेल्या कामात यश मिळेल. जास्त वेळ मित्रांसोबत घालवाल. मित्रांची अनेक कामे तुमच्या मदतीने होतील.
सिंह : कार्यक्षेत्र आणि व्यवसायात विरोधकांवर मात कराल. नवी कामे मिळतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला सहकार्य मिळेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही विरोधकांवर भारी पडाल. नोकरीमध्ये प्रगती कराल. तुम्ही केलेल्या कामातून धनलाभ होईल. मुलांकडून सुख मिळेल. जुन्या मित्रांशी भेटी होतील. आज पैसे आणि परिवारा संदर्भात तुमचे विचार योग्य असतील.
कन्या : कार्यक्षेत्रात पदोन्नती होण्याचे योग संभवतात. व्यवसायात धनलाभ संभवतो. आज प्रेमी आणि जोडीदारच तुमची मोठी ताकद बनतील. नोकरीत पदोन्नतीची संधी आहे. कामकाज वाढू शकते. तुम्हाला नशिबाने धनलाभ होईल. महत्त्वाच्या लोकांशी तुमच्या भेटी होतील. तुम्हाला नवी संधी मिळेल. येणाऱ्या काळात तुम्ही प्रगती करण्यात यशस्वी व्हाल.
तूळ : तुम्हाला आरोग्यासंबंधी काळजी घ्यायला हवी आणि कामकाजात संपूर्ण सावध राहायला हवे. जोडीदार तुमच्याशी भांडू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. स्वत:वर नियंत्रण ठेवा. कार्यक्षेत्रात कोणता नवा विचार करु नका. दिवसभराच्या धावपळीने डोकेदुखी आणि अंगदुखी होऊ शकते. थकायले होईल. आराम करा. वेळ तुमच्या योग्य फार कमीच आहे.
वृश्चिक : अडकलेला पैसा परत येईल. वरिष्ठ आज तुमच्या कामावर खूष असतील. कोणती तरी नवी जबाबदारी मिळेल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. लव लाईफ देखील चांगली राहील. पैशांच्या स्थितीत सुधार आणण्याची संधी मिळेल. पार्टनरला तुमच्याकडून फायदा होऊ शकतो. रोजच्या कामातून धनलाभ होईल. पार्टनरला तुमच्यामुळे फायदा होईल. कोणत्या आवडच्या व्यक्तीच्या संपर्कात याल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. खाण्यापिण्यात सावधानी बाळगा.
धनु : खालच्या वर्गातील लोकांकडून मदत आणि फायदा मिळेल. व्यवसायात नव्या योजना समोर येतील. आज तुम्हाला एक नवी सुरूवात करण्याची संधी मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठ सर्वच तुम्हाला मदत करतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही यशस्वी व्हाल. जुन्या काळात तुम्ही कोणाला जास्त मदत केली असेल तर अचानकर तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही प्रेमाच्या शोधात असाल. जोडीदाराला खूश करताना पैसे खर्च होतील.
मकर : व्यवसायात छोटा आणि फायदेशीर प्रवास होण्याचे योग आहेत. नवी जबाबदारी मिळू शकते. नोकरीत प्रगती होईल. काही नव्या संधी मिळतील. अचानक धनलाभ होईल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल. नव्या जबाबदारी मिळतील. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवाल. कुठेतरी फिरायला जाल. आरोग्यासाठी दिवस चांगला राहील.
कुंभ : नोकरीमध्ये प्रदर्शन चांगले राहील. व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत. वरिष्ठ तुम्हाला मदत करतील. मुलाखत चांगली राहील. जुने मित्र कोणत्यातरी नोकरीसाठी तुम्हाला मदत करतील. नोकरीत चांगले प्रदर्शन कराल. पैशांसाठी छोटा प्रवास करावा लागेल. कोणती तरी चांगली बातमी मिळू शकते. मनोरंजनात वेळ घालवाल. आरोग्याच्या बाबतीत सावध राहा.
मीन : तुमचे कामकाज आणि ते करण्याच्या पद्धतीत थोडा बदल येऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायामध्ये मन लागेल. काम कमी असेल आणि कन्फ्यूजन वाढेल. प्रियसीसोबत भांडणे होतील. तुमच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतील. काही लोक तुमच्या मेहनतीचे क्रेडीट स्वत: घेतील. तुमच्या मनातील स्थिती सर्वांसमोर सांगू नका.