आजचे राशीभविष्य | रविवार | 10 फेब्रुवारी 2019
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष : तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक राहील. मन देखील मजबूत राहील. घर, जमीनीशी संबंधीत कामांसाठी तुम्हाला वेळ मिळेल. ऑफिसमधील काही अर्धवट कामे पूर्ण होतील. जे बदल होत आहेत ते तुमच्या प्रगतीसाठी आहेत. परिवार आणि समाजातील लोक तुमच्यासाठी मदत करणारे ठरतील.
वृषभ : आज तुम्ही थोड धैर्य आणि लक्ष केंद्रीत केलात तर यश मिळेल. ठरवलेली कामे सहज पूर्ण होण्याचा योग आहे. आज तुम्ही येणाऱ्या दिवासंचे प्लानिंग बनवाल. कोणत्या तरी खास व्यक्तीशी तुम्ही आपल्या मनातील गोष्ट बोलाल. काही मोठे निर्णय देखील तुम्ही घेऊ शकता. आईचे सुख मिळेल. व्यवसाय वाढण्याचे योग आहेत.
मिथून : द्विधा मनस्थितीतून बाहेर पडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. पैसे मिळण्याचे योग आहेत. कोणत्या तरी एका व्यक्तीशी तुमचे संबंध सुधारण्याचे योग आहेत चांगली बातमी मिळेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील. नवी जबाबदारी मिळण्याचे योग आहेत.
कर्क : त्रासातून मुक्ती मिळेल. कोणत्या तरी नव्या तंत्रज्ञानामुळे तुमचे काम सोपे होईल. कोणते तरी नवे उपकरण देखील तुम्ही खरेदी करु शकता. कोणत्या नव्या विचारावर काम करु शकता. नवा विचार आणि तंत्रज्ञान तुम्हाला फायदेशीर ठरु शकते. व्यवसायात परिवाराची मदत मिळेल. नव्या व्यवसायाची सुरूवात होईल. प्रेमात यश मिळेल.
सिंह : तुमच्या मनात कोणते तरी मोठे विचार येऊ शकतात. विश्वासातील लोकांशी वेळेवरच सल्ला आणि मदत घ्या. तुम्ही तुमची प्रतिभा दाखवण्यात यशस्वी व्हाल. वाचन आणि काही नवे शिकण्यात आवड दाखवाल. व्यवसाय किंवा नोकरी निमित्ताने प्रवास होऊ शकतो. संयम पाळलात तर स्वत: ला फायदा होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील.
कन्या : करिअरमध्ये बदल करण्याच्या दृष्टीने वेळ योग्य आहे. ठराविक आणि स्पष्ट बोलण्याने तुम्ही अडचणीतून बाहेर पडू शकता. मित्र आणि नातेवाईकांची मदत मिळेल. संबंध सुधारतील. व्यवसायात यश मिळेल. विवाह योग्य लोकांना प्रस्ताव मिळतील. कोणता मोठा निर्णय घेण्याआधई सल्ला नक्की घ्या.
तूळ : अविवाहीत लोकांचे प्रेम आयुष्य चांगले असेल. लग्न झालेल्यांना जोडीदाराची मदत मिळेल. जोडीदाराशी तुमचे संबंध मधुर राहतील. कार्यक्षेत्रात काही लोकांची मदत मिळेल. फिरणे आणि मनोरंजन करण्यात वेळ घालवाल. आज कोणती तरी चांगली बातमी देखील मिळू शकते. व्यवसायात व्यस्त व्हाल. नोकरीमध्ये नवे काम मिळण्याचे योग आहेत. काहीतरी नवे शिकायला मिळेल.
वृश्चिक : मेहनत कराल तर जास्त फायदा होईल. तसेच कोणासोबत तरी विशेष बोलणी होतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल. सोबत करणारा कोणीतरी तुम्हाला करिअरशी संबंधित प्रकरणात मदत करेल. आज तुम्ही खुश असाल. कामाच्या ठिकाणी संयम दाखवा. ज्या पद्धतीने तुम्ही बोलाल त्यामुळे समोरची व्यक्ती तुमच्या बाजून झुकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी चांगले वातावरण असले.
धनु : तुमच्या मनातील बाब कोणाला सांगायची असल्यास सांगून टाका. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीवर लक्ष द्या. तुमच्या मनातील आवाज ऐकण्याचा प्रयत्न कराल. आज तुम्ही कोणते तरी रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायासाठी नव्या लोकांशी संपर्क साधावा लागेल. वैवाहीक आयुष्यात आनंद येण्याचे योग आहेत. जोडीदाराकडून सन्मान मिळेल.
मकर : तुमची कोणती तरी मोठी अडचण पैशातून सुटेल. कमाईमुळे मार्ग मोकळे होतील. आज कामकाज जास्त असू शकते. बॉसशी बोलण्यातून तुम्हाला यश मिळू शकते. व्यवसायात फायदा होण्याचे योग आहेत. सहकार्यांची मदत मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. रोजची कामे पूर्ण होतील. तुमचे आरोग्य देखील चांगले राहील.
कुंभ : नोकरदार आणि व्यवसाय करणारे आपल्या कामातून संतुष्ट होऊ शकतील. वरिष्ठांशी चर्चा होण्याची शक्यता आहे. कोणाची तरी मदत करण्याची संधी मिळेल. विरोधकांवर विजय मिळवाल. मुलांकडून सुख मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतूक करतील. पती-पत्नी यांच्यामध्ये सामंजस्य राहील. आई वडीलांचे आशीर्वाद घ्या.
मीन : धन लाभ होण्याची संधी आहे. पैशांच्या बाबतीत चांगला सुधार होण्याची शक्यता आहे. काही संधींचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. अचानक धन लाभ होऊ शकतो. गुंतवणुकी संदर्भात सल्ला घ्या. तुमचा आत्मविश्वास वाढेल. सुख मिळेल. कुठूनतरी कोणती चांगली बातमी मिळू शकेल. कामधंदा चांगला चालेल. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील.