मेष - कामात जबाबदारी वाढू शकते. दिवसभर व्यस्त राहाल. व्यवसायातील काही गोष्टी समजूतीने हाताळाल. त्यात यश मिळेल. ऑफिसमध्ये शांतता राहील. प्रवासाची आखणी करू शकाल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ - जुन्या समस्या संपतील. स्वत:कडे लक्ष द्या. नवीन कपड्यांची खरेदी करू शकता. योजलेली कामे पूर्ण करू शकता. खर्चाकडे लक्ष द्या. मित्रांची मदत मिळेल.


मिथुन - धनलाभ होऊ शकतो. अधिक काळ चालू शकणाऱ्या कामात फायदा होईल. काही महत्त्वपूर्ण विचार किंवा योजना आज आखू शकता. अविवाहितांचा विवाह जमण्याची शक्यता आहे. आपल्या बुद्धीने कामे पूर्ण करू शकता. स्वत:ला सिद्ध करू शकाल. मित्र आणि कुटुंबीयांकडून मदत मिळू शकते. चांगली बातमी मिळू शकते. खुश राहाल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे.


कर्क - अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. समस्येतून बाहेर पडण्यासाठी मित्रांची मदत मिळेल. पैशांसंबंधी समस्या सोडवू शकाल. कामासंबंधी चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना येऊ शकतात. समस्या असल्यास लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. व्यवहारकुशलतेने आणि समजूतदारीने काम केल्यास अधिकतर समस्यांचे स्वत:च निकारण होईल.


सिंह - आर्थिक स्थितीमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खुश राहाल. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. अधिकारी तुमच्यावर खुश राहतील. ऑफिसमधील तणावपूर्ण परिस्थिती संपेल. मेहनत आणि समजदारीने कठीण कामेही पूर्ण करू शकाल. मोठी समस्या मार्गी लागू शकते.


कन्या - कामात काही नवे बदल केल्यास त्याचा फायदा होईल. दिवस चांगला आहे. आज जो काही विचार कराल त्यात यश मिळेल. अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत होईल. जुनी कामे पूर्ण होऊ शकतात. कौटुंबिक समस्यांवर मार्ग मिळेल.


तुळ - विचार केलेली जुनी कामे करण्यास सुरूवात करा. याचा फायदा होईल. दिवस चांगला आहे. मित्रांसोबत वेळ मिळेल. धनलाभ होऊ शकतो. उधारीवर दिलेले पैसे परत मिळू शकतात. ऑफिस आणि व्यवसायात तुमच्यासाठी घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.


वृश्चिक - दिवस खास असेल. येणाऱ्या काही दिवसांत फायदा करणाऱ्या गोष्टी समोर येतील. कठीण समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. तुमच्या समजूतदारपणाचा वापर करा. आरोग्य चांगले राहील. नवीन व्यवहार तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नशीबाची साथ मिळेल. 


धनु - नोकरी, करियर आणि पैशाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. नवीन नोकरी किंवा प्रमोशन मिळण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश मिळेल. नवीन लोकांशी ओळखी होतील. अनेक लोक तुमची मदत करण्यासाठी तयार असतील.


मकर - महत्त्वपूर्ण कामे करू शकतात. यामुळे फायदा होऊ शकतो. संपूर्ण मेहनत करा. रखडलेली कामे पूर्ण झाल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. नवीन काम करण्यापेक्षा आधीची कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्या. अविवाहितांसाठी दिवस चांगला आहे. 


कुंभ - आज दिवसभर पैशांसंबंधी विचार कराल. प्रॉप्रर्टीच्या कामात धनलाभ होऊ शकतो. अधिक काम पडेल. ऑफिसमध्ये तुमच्या प्रगतीबाबत विचार कराल. पुढे जाण्यासाठी काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. आरोग्य चांगले राहील.


मीन - आज जे काही काम कराल त्यात फायदा होईल. कामातून पैसे मिळतील. पैशांसंबंधी काही विचार येऊ शकतात. त्यावर त्वरित पाऊले उचला. बाहेर फिरण्यासाठी दिवस चांगला आहे.