Todays Panchang : शुभ मुहूर्त जाणत करा आठवड्याची सुरुवात; पाहा आजचं पंचांग
Todays Panchang : एका नव्या आठवड्याची आणि एका नव्या दिवसाची सुरुवात झाली आहे. तुम्ही आजच्या दिवशी काही गोष्टींसाठी शुभ योग पाहत आहात का? पाहून घ्या आजचं पंचांग.
Todays Panchang : आज सोमवार. मार्च महिन्यातील शेवटचा आठवडा आज सुरु झाला आहे. वर्षातील एक महिना संपण्याच्या मार्गावर असतानाच अनेकांच्या मनात असणारी काही कामं मात्र ताटकळली आहेत. असं असतानाच ही कामं किंवा ही शुभकार्य सिद्धीस नेण्यासाठी अनेकजण दर दिवशी काही शुभ मुहूर्त शोधताना दिसतात. आजही असाच एक दिवस. दैनंदिन व्यवहार सांभाळून त्यातूनच वेळ काढत एक नवी सुरुवात करण्यासाठी आग्रही दिसतात. तुम्हीही त्यातलेच आहात का? तर मग पाहून घ्या आजचं पंचांग.
पंचांगानुसार पाहून घ्या शुभ वेळा, अशुभ काळ आणि काही महत्त्वाच्या वेळा. ज्यामुळं तुम्हालाही आजच्या दिवशी नेमकं केव्हा कोणती कामं करायची आहेत याचा अंदाज येईल.
आजचा वार - सोमवार
तिथी- षष्ठी
नक्षत्र - रोहिणी
योग - आयुष्मान
करण- तैतिल, गर
आज सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - सकाळी 06:17 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.36 वाजता
चंद्रोदय - 09:54
चंद्रास्त - 00:30
चंद्र रास- वृषभ
आजचे अशुभ काळ
दुष्टमुहूर्त– 12:51:30 से 13:40:44 तक, 15:19:11 से 16:08:24 तक
कुलिक– 08:47:50 पासुन 09:36:43 पर्यंत
कंटक– 15:19:11 से 16:08:24 तक
राहु काळ– 08:45:23 से 09:34:36 तक
कालवेला/अर्द्धयाम– 07:50:00 से 09:22:18 तक
यमघण्ट–10:23:50 से 11:13:03 तक
यमगण्ड– 12:02:17 से 12:51:30 तक
गुलिक काळ– 13:59:11 से 15:31:29 तक
शुभ काळ
अभिजीत मुहूर्त - 12:02:17 से 12:51:30 तक
विजय मुहूर्त - दुपारी 02:35 पासून 03:25 पर्यंत
हेसुद्धा वाचा : Horoscope 27 March 2023 : 'या' राशीच्या व्यक्तींना भूतकाळातील गुंतवणुकीचा फायदा होईल!
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - मूल, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, उत्तराभाद्रपद, अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा
चंद्रबल - वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)