Touch Wood: अनेक वेळा आपण आपल्या आजूबाजूला टचवुड बोलणारी लोक पाहिली आहेत. अगदी आपण पण अनेक वेळा टचवुड म्हणतो. कदाचित ही तुमची एक सवय देखील असू शकते. पण टचवुड म्हणजे काय आणि ते का म्हटलं जातं. हा शब्द नेमका आला तरी कुठून याबद्दल तु्म्हाला कधी प्रश्न पडला नाही का? आम्हाला पडला की हा शब्द आला तरी कुठून म्हणून आम्ही ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. (Touchwood meaning in jyotish and why we say Touchwood nmp)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टचवुड हा इंग्रजी शब्द आहे ज्याचा अर्थ लाकडाला स्पर्श करणे असा होतो. जेव्हा लोक एकमेकांशी बोलताना स्वतःबद्दल अशी एखादी आनंदाची गोष्ट सांगतात किंवा त्यांच्या आयुष्यातील आनंदाचा क्षणाबद्दल सांगतात, त्यावेळी आपल्या असं वाटतं की, आपल्या आनंदाला नजर लागेल अशावेळी आपण पटकन टचवुड म्हणतो. 


असा झाला टचवुड शब्दाचा जन्म  ( History of Touchwood )


टचवूड या शब्दाचा वापर कधीपासून केला जात आहे यासंदर्भात नक्की तसं सांगता येणार नाही.  तरीही असं मानलं जातं की ते प्राचीन काळापासून हा शब्द वापरला जातो. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात याची सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे. स्टीव्ह राऊडच्या मते (Steve Roud), 1805 ते 1828 या काळात त्यावरून लिखित पुरावे आहेत. त्यावेळी टिगी टच वुड ( Tiggy Touch Wood ) हा लहान मुलांचा खूप प्रसिद्ध खेळ होता. स्टीव्ह रॉडच्या मते, या खेळापासून हा शब्द इतर भाषा आणि संस्कृतींमध्ये पसरला. त्याचप्रमाणे भारतातील हिंदू धर्मातील विविध झाडे आणि वनस्पतींची पूजा हे देखील याचंच एक उदाहरण आहे.


टचवुड म्हणताना या गोष्टी लक्षात ठेवा


स्पिकिंग टचवुडसह लाकडाला स्पर्श करणे शुभ मानलं जातं. जर टचवुड बोलले आणि लाकडाला स्पर्श केला नाही तर ते अशुभ मानलं जातं. टचवुड बोलल्यानंतर चंदन (andalwood), रुद्राक्ष (Rudraksha), तुळशीला स्पर्श करणे अधिक शुभ मानले जाते. याशिवाय चंदन, रुद्राक्ष, तुळशी हे नजर दोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण करण्यास सक्षम आहे.