मुंबई : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेबरोबरच झाडांच्या पूजेलाही विशेष महत्त्व दिलं गेलंय. अनेक वृक्षांमध्ये देव वास करतात असं म्हटलं जातं. नियमानुसार त्यांची पूजा केल्याने भगवंताची कृपा प्राप्त होते. जाणून घेऊया कोणत्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी कोणत्या झाडाची पूजा करावी.


अशोक वृक्ष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखाद्या व्यक्तीला आजारांनी घेरलं असेल किंवा बराच काळ आजारी असेल तर त्याने अशोक वृक्षाची पूजा करावी. त्याची पूजा केल्याने दुःख दूर होतात. कौटुंबिक जीवनात आनंद वाढतो. कोणतीही विशेष इच्छा पूर्ण होण्यासाठी अशोक वृक्षाची पूजा करावी.


केळीचे झाड


हिंदू धर्मात केळीच्या झाडाला भगवान विष्णूचं निवासस्थान मानलं जातं. त्याचबरोबर कुंडलीत गुरु दोष असल्यास त्या व्यक्तीला केळीच्या झाडाची पूजा करण्यास सांगितलं जातं. केळीच्या झाडाची पूजा केल्याने व्यक्तीचं लग्न लवकर होतं असं मानलं जातं. इतकंच नाही तर धार्मिक कार्यातही याचा वापर केला जातो. 


लाल चंदनाचे झाड


लाल चंदनाचा वापर अनेक ज्योतिषीय उपायांमध्ये केला जातो. अशा स्थितीत जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याशी संबंधित ग्रह दोष असेल तर तो दूर करण्यासाठी लाल चंदनाच्या झाडाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. 


डाळिंब्याचं झाड


असं म्हणतात की डाळिंब्याच्या झाडाच्या पुजेने घरात सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच याध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)