Trigrahi Yog: मंगळ, केतू आणि चंद्राने बनवला त्रिग्रही योग; `या` राशींना मिळणार पैसाच पैसा
Trigrahi Yog: ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत.
Trigrahi Yog: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेप्रमाणे त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. असंच ग्रहांच्या बदलामुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे. 15 ऑक्टोबर 2023 ते 17 ऑक्टोबर 2023 हा काळ काही राशीच्या लोकांसाठी सुवर्ण काळ ठरू शकणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी मंगळाचं तूळ राशीत गोचर झालं होतें. या वेळी केतू आधीच बसला आहे. तर 15 ऑक्टोबरला या राशीत चंद्राच्या प्रवेशामुळे हा शुभ त्रिग्रही योग तयार झालाय.
ज्योतिषीय शास्त्रानुसार, 17 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:19 वाजता चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. यावेळी हा शुभ त्रिग्रही योग संपणार आहे. दरम्यान या त्रिग्रही योगाच्या निर्मीतीमुळे काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचे फायदे होणार आहेत.
मिथुन रास
या त्रिग्रही योगाच्या निर्मितीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळणार आहे. पाचव्या घरात तयार होत असलेला हा शुभ योग तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. व्यवसायात फायदा होईल आणि परदेशातही जाऊ शकता. तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळतील. काही मोठे बदल देखील करू शकतात.
धनु रास
या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत. नोकरीच्या नवीन संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. व्यवसाय केला तर नफा मिळेल. परदेशातून आर्थिक लाभ होऊ शकतो. कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि सर्व संबंध सुधारतील. तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील.
कन्या रास
करिअरच्या दृष्टिकोनातून हे तीन दिवस शुभ राहणार आहे. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकतो. मेहनतीचे फळ नक्कीच मिळू शकणार आहे. कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. आर्थिक लाभाचे नवीन स्रोत उघडू शकतात. शेअर मार्केटमधून भरपूर पैसा हाती लागणार आहे. मोठ्या करारावर स्वाक्षरी करू शकता. या काळात चांगला नफा होऊ शकतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)