मुंबई : आपली सकाळ ही आपला संपूर्ण दिवस ठरवत असते. त्यामुळे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी कोणती काम करावीत अशी प्रत्येकाची अशी एक लिस्ट असते. अगदी तसेच कोणती काम प्रकर्षाने टाळावीत याची देखील एक यादी आहे. कारण चुकीच्या गोष्टी तुमचा दिवस खराब घालवू शकतात. त्यामुळे या गोष्टींचा अजिबात वापर करू नका? 


या गोष्टी केल्यावर दिवसाची सुरुवात खराब झाल्यास दिवस वाईट जातो. यामुळे सकाळी-सकाळी शुभ काम करण्याची आणि शुभ गोष्टी पाहण्याची प्रथा कायम आहे. सकाळी उठल्यानंतर अशुभ गोष्टींपासून दूर राहावे. येथे जाणून घ्या,


सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत 


आरसा पाहू नये 
अनेकांना सकाळी उठल्या उठल्या आरशात पाहण्याची सवय असते. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले आरसा पाहणे अशुभ मानले जाते. यामुळे वास्तुनुसार  बेडरूममध्ये आरसा लावणे वर्ज्य आहे. सकाळी आरसा पाहिल्याने विचारांमध्ये नकारात्मकता वाढते. पलंगाच्या समोर आरसा असल्यास, त्यावर पडदा टाकून ठेवावा.


सावली पाहू नये 
सकाळी उठल्यानंतर सावली पाहू नये. स्वतःची सावली पाहिल्याने दुर्भाग्य वाढते. यामुळे सकाळी असे करू नये.त्यामुळे उठल्यावर सुरूवातीला शांत बसावे आणि मग दिवसाला सुरूवात करावी. 


हिंस्र प्राण्याचे फोटो
सकाळी झोपेतून उठल्यानंतर सकारात्मक विचार मनात येतील असे फोटो डोळ्यासमोर असावेत. हिंस्र प्राण्याचे फोटो पाहू नयेत. यामुळे मनामध्ये वाईट विचार येतात. तसेच अनेकांना आपल्या घरात प्राण्यांचे फोटो लावायाची सवय असते. त्या लोकांनी असे फोटो सकाळी उठल्या उठल्या पाहू नयेत. 


सकाळी उठल्यानंर पाहाव्यात शुभ गोष्टी
सकाळी झोपेतून उठल्यानंतर शुभ गोष्टी पाहाव्यात. उदा. सकाळी उठल्यानंतर सर्वात पहिले तळहातांचे दर्शन घ्यावे. देवी-देवतांचे फोटो किंवा सुंदर सकारत्मक फोटो पाहावेत. व्यायाम करावा. किंवा सकाळी उठल्यावर बेडमध्येच थोडा वेळ नामस्मरण करावे जेणे करून तुमच्या दिवसाची सुरूवात चांगली होते.