Tuesday Remedies : मंगळवारी `या` 5 वस्तू दान करा, मग बघा कसा घरात पडतो पैशांचा पाऊस
Tuesday Remedies : मंगळवारी काही वस्तू दान केल्याने तुमच्या जीवनात चांगला बदल दिसून येईल. सकारात्मकता वाढीला लागेल. तसेच काही चमत्कारिक फायदे पाहायला मिळतील. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की दान केल्याने माणसाला सत्कर्म प्राप्त होते.
Tuesday Remedies : मंगळवार हा भगवान बजरंगबलीला समर्पित आहे. या दिवशी काही वस्तूंचे दान केल्याने घरात भरभराट राहते. सुख आणि समृद्धीचे सर्व मार्ग खुले होतात, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. हिंदू धर्मात दानाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. दान केल्याने व्यक्तीला सत्कर्म प्राप्त होते. तसेच त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतो. तसेच घरात पैशाचा पाऊस पडतो. त्यामुळे आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.
ज्योतिषशास्त्रानुसार आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतो. त्याचप्रमाणे मंगळवार हा हनुमानचा आहे. या दिवशी पूजा आणि व्रत इत्यादी केल्याने त्याचा आशीर्वाद मिळतो आणि घरात सुख-समृद्धी नांदते, असे सांगितले जाते. मंगळवारी हनुमाला आवडत्या वस्तूंचे दान केल्यास व्यक्तीचे भाग्य उजळते.
मंगळवारी या वस्तूंचे दान करा
हनुमानजींना लाडू खूप प्रिय
हनुमानला गोड खूप प्रिय आहे. त्याला लाडू अर्पण केल्यास तो लवकर प्रसन्न होतो. ज्योतिष शास्त्रानुसार जर तुमची प्रमोशनची शक्यता खूप दिवसांपासून असेल आणि प्रमोशन अडकले असेल तर मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात बेसनाचे लाडू दान करा. यामुळे भगवान बजरंगबलीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि उत्पन्न वाढते. तसेच, पदोन्नतीत वाढ होते.
नारळ दान करणे
मंगळवारी नारळ दान करणे शुभ मानले जाते. जर कुटुंबातील कोणताही सदस्य दीर्घ काळापासून आरोग्याशी संबंधित आजारांनी त्रस्त असेल किंवा तुम्हाला दीर्घ काळापासून आरोग्याशी संबंधित आजारांनी त्रास होत असेल, तर मंगळवारी मंदिरात नारळ दान करा. यामुळे व्यक्तीला आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आणि त्या आजापासून लवकर सुटका होते.
लाल कपडा आणि फळे दान करा
बजरंगबलीला लाल रंग खूप प्रिय असल्याचे शास्त्रात सांगण्यात आले आहे. मंगळवारी लाल रंगाची फुले आणि लाल रंगाचे कपडे दान करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीला मंगळ दोषांपासून सुटका मिळते. हा उपाय केल्याने भगवान बजरंगबली प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीला खूप सारे आशीर्वाद मिळतात.
तुळशीची पाने
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी देवी वास करते, असे सांगितले गेले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मंगळवारी हनुमानजींना तुळशीची पाने किंवा त्यापासून बनवलेली तुळशीची माळ अर्पण केल्यास शुभ फळ मिळते. तुळशीच्या पानांचे दान केल्याने माणसाला आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.
लाल मसूर
ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे, त्यांनी नियमानुसार मंगळवारी पूजा करावी. या दिवशी लाल मसूर दान केल्याने हनुमानाची कृपा होते असे म्हणतात. असे म्हटले जाते की मंगळवारी हे उपाय केल्याने मंगळाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि विवाहात कोणतेही अडथळे येत नाहीत.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)