Tulsi Plant Vastu: घरातील तुळस योग्य दिशेला ठेवलीये ना? पाहा, नाहीतर खूप काही झेलावं लागेल
तुळस घरात असली म्हणजे सर्व झालं, असं नाही; तर....
Right direction to keep tulsi plant at home: हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे. वास्तुशास्त्राच्या अनुषंगानं घरात तुळस असल्यामुळं बऱ्याच समस्या दूर होतात. तुळशीचं लहानसं रोप घरात भरभराट, आणि सकारात्मकता आणतं. विष्णू आणि लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणूनही या रोपाकडे पाहिलं जातं.
तुळस घरात असली म्हणजे सर्व झालं, असं नाही. तर, ती योग्य दिशेला असणंही तितकंच महत्त्वाचं. अन्यथा तिची अवकृपा होण्यासही वेळ लागत नाही.
तुळस ठेवण्याची योग्य दिशा कोणती?
घरात तुळस कधीच दक्षिण दिशेला ठेवू नये. ही दिशा यम आणि पितरांची आहे. इथं तुळस ठेवल्यास लक्ष्मी नाराज होते असं म्हणतात. लक्ष्मीच्या अवकृपेमुळे कुटुंबात गरीबी येते.
उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळ ठेवणं केव्हाही उत्तम. कारण ही कुबेराची दिशा आहे. या दिशेला तुळस असल्यास धनधान्य संपत्तीचा आशीर्वाद लाभतो. कामात प्रगती होते.
तुळशीच्या बाबतीत महत्त्वाची माहिती
तुळस ज्या ज्या घरात आहे त्यांनी रविवार आणि एकादशीच्या दिवशी तिला जल अर्पण करु नये. असं म्हणतात की या दिवशी तुळस विष्णुसाठी उपवास करते. तुळस कधीच छतावर लावू नका. तिच्या आजुबातूला केर नका टाकू. एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळचीची पानंही तोडू नका.
(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)