Tulsi Plant Vastu Tips: तुळशीचे अनेक फायदे आहेत. प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात तुळस ऑक्सिजन सोडते. तसेच तुळशीची वनस्पती हिंदू धर्मात अतिशय शुभ आणि पूजनीय मानली जाते. तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा सहवास असल्याचे शास्त्रात सांगितले आहे. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते, तेथे लक्ष्मी आणि भगवान विष्णूच्या कृपेने कोणताही त्रास होत नाही. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण केल्यासच पूजा पूर्ण होते. तसेच हिरव्या पानांप्रमाणे सुकलेल्या पानांनाही ज्योतिषशास्त्रात विशेष महत्त्व आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामीण भागात आपल्याला अंगणात तसेच घराच्या पाठिमागे तुळशी वृंदावन दिसते. आजही तुळशीची पूजा केली जाते. तर शहरात गॅलरी किंवा टेरेसवर तुळशीची रोपे लावलेली पाहायला मिळतात. वास्तुशास्त्रात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तुळशीची पाने कधीच शिळी होत नाहीत, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. तुळशीच्या पानांच्या उपायांनी जीवनातील अनेक समस्या दूर होऊ शकतात. सुकलेल्या तुळशीच्या पानांचा वापर कसा करता येईल ते जाणून घेऊया. 


कोरड्या तुळशीच्या पानाचा उपाय 


श्रीकृष्णाला स्नान घालावे


हिंदू शास्त्रात भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचे रुप आहेत. अशा स्थितीत श्रीकृष्णाच्या बालस्वरुपाची पूजा करुन त्यांना कोरड्या तुळशीच्या पानांच्या पाण्याने स्नान करुन भगवान गोपाळकृष्ण प्रसन्न होतात. तसेच जीवनात सुख-समृद्धी येते. 


भगवान श्रीकृष्णाला तुळशीची पाने आवडतात


भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्णाला अन्न अर्पण करताना तुळशीच्या पानांचा वापर करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची सुकलेली पाने सुमारे 15 दिवस ठेवता येतात. तुळशीची पाने 15 दिवस शिळी होत नाहीत.


आर्थिक स्थिती चांगली राहते


जर तुम्हाला खूप दिवसांपासून पैशाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत असेल आणि त्यातून सुटका हवी असेल तर सुकलेली तुळशीची पाने लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा. असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील. या उपायाने आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही. 


वास्तुदोष दूर करण्यासाठी 


घरामध्ये वास्तुदोष असल्यास किंवा नकारात्मक ऊर्जा दूर करायची असल्यास एका भांड्यात तुळशीची पाने आणि गंगेचे पाणी एकत्र करून हे पाणी घरभर शिंपडा.