मुंबई : दिवाळीनंतर तुळशीच्या लग्नाची गडबड सुरू होती. दिवाळीच्या चातुर्मासाच्या समाप्तीदिवशी तुळशीचा विवाह असतो. काल झालेल्या कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज मंगळवारी तुळशीचं लग्न आहे. तुळशीचा विवाह झाल्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांनादेखील प्रारंभ होतो. वरूणराजाला निरोप देऊन शिशिराचे आगमन होते आणि विवाहसोहळ्याच्या तयारीला सर्वचजण लागतात. आज मंगळवारी 20 नोव्हेंबर 2018 रोजी तुळशीचं लग्न आहे. 


असा करतात तुळशी विवाह 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळशी विवाहामध्ये तुळशीला अगदी वधूच्या रुपात सजवलं जातं. तुळशीचा विवाह शाळीग्राम दगडाडाशी लावण्याची प्रथा आहे. शाळीग्राम हे विष्णूचं रुप समजलं जातं. तर काही ठिकाणी तुळशीचा विवाह हा लहान मुलासोहत देखील लावला जातो. त्या लहान मुलाला अगदी नवरदेवाप्रमाणेच सजवलं जातं. 


तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त 


19 नोव्हेंबर 2018 दुपारी 2:29 वाजल्यापासून


 20 नोव्हेंबर 2018 संध्याकाळी 5.10 मिनिटांपर्यंत


तुळशी विवाह हा हिंदूधर्मातील अतिशय पवित्र सोहळा मानला जातो. या विवाहानंतर घरातील इतर विवाहांना सुरूवात होते. तुळस ही अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदात तुळशीचे अतिशय महत्व सांगितले जाते. तुळशीच्या रोपाची घरात रूजवणी केल्यानंतर 3 वर्षांनी त्या तुळशीचा विवाह सोहळा संपन्न होतो. तिला स्नान घालून अभिषेक करून नववधूप्रमाणे सजवले जाते.  त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात. घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत आंतरपाट धरून मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो.