Surya Gochar 2023 Vashi Rajyog Impact in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपली स्थिती एका ठराविक वेळेनंतर बदलत असते. यापैकी शनि ग्रह हा सर्वात धिम्या गतीने म्हणजे अडीच वर्षांने तर चंद्र सर्वात कमी सव्वा दिवसात आपली रासी बदलतो. तर सूर्य (Sun Transit) हा दर महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. सूर्य गोचरला सूर्य संक्रांती असंही म्हणतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सूर्य कर्क राशीत असून 16 ऑगस्टला तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत बुध ग्रह विराजमान आहे. सूर्य सिंह राशीत असतानाच चंद्र हा कर्क राशीत असणार आहे. तर शुक्र सूर्यापासून 12 व्या घरात आहे. अशा स्थितीत कुंडलीत अतिशय दुर्मिळ आणि शुभदायी वाशी राजयोग तयार होतं आहे. याच वेळी चंद्र आणि मंगळाचा संयोगदेखील आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यातील वाशी राजयोग 5 राशीच्या लोकांसाठी लकी ठरणार आहे. (vashi rajyog and budhaditya yog in august 2023 Sun Transit 16 Augast Surya Gochar 2023 these zodiac sign get money)


मेष (Aries)


मेष राशीच्या लोकांना वाशी राजयोग फलदायी सिद्ध होणार आहे. शैक्षणिक क्षेत्रासाठी हा लाभदायक असणार आहे. परदेशात प्रवास घडणार आहे. धार्मिक कार्यात मनं रमणार आहे. एखादी तिर्थयात्रेला तुम्ही जाऊ शकता. मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांना वाशी राजयोग अतिशय फलदायी ठरणार आहे. तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास या काळात दिसणार आहे. आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. प्रगती आणि यशाचे मार्गाकडे तुमची वाटचाल सुरु होईल. उत्पन्नात वाढ होणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. 


तूळ (Libra)


या राशीच्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. तुमच्या अनेक वर्षांच्या इच्छा आता सहज पूर्ण होणार आहे. सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. आर्थिक लाभामुळे तुमचं मनोबल वाढणार आहे. वाशी राजयोगामुळे तुमचे अच्छ दिन सुरु होणार आहे. 


वृश्चिक (Scorpio)


वाशी राजयोगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना यशाचे मार्ग मोकळे होणार आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात आनंद असणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होणार आहे. 


धनु (Sagittarius)


धनु राशीच्या लोकांसाठी वाशी राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. तुमच्या प्रयत्नांना नशिबाची साथ मिळणार आहे. आनंदी आनंद वातावरण असणार आहे. वैवाहिक जीवनात समाधान आणि आनंद असणार आहे. तुम्हाला या दिवसांमध्ये अनेक फायदे होणार आहेत.


हेसुद्धा वाचा - राहूच्या नक्षत्रात शनीचं गोचर! 'या' राशीच्या लोकांनी घ्यावी काळजी


 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)