मुंबई : तुम्हालाही दिवाळीपूर्वी तुमच्या घराच्या भिंती आणि खोल्या रंगवायच्या असतील तर वास्तूचे हे नियम नक्की जाणून घ्या. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता येऊ शकते आणि तुम्हाला माँ लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. आपल्या आवडीचे घर मिळणे ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी इच्छा असते. त्यासाठी तो त्याच्या भिंतींवर विविध प्रकारची रंगरंगोटीही करून घेतो. असे म्हटले जाते की वास्तूनुसार, घराला भिंतींवर केलेल्या रंगाचा सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबात आनंद येतो. तुम्हीही नवीन घर बांधत असाल किंवा जुने घर रंगवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता रंग योग्य असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाशी  निळा रंग
वास्तुशास्त्रानुसार घरातील खोल्यांच्या रंगासाठी हलका निळा रंग योग्य मानला जातो. हा रंग तुम्ही घराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीवरही करु शकता. लक्षात ठेवा, गडद निळा रंग वापरू नका, तर तो आकाशी निळा रंग असावा. घराचा उत्तरेकडील भाग पाण्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. वास्तूनुसार उत्तर दिशेच्या भिंतींवर पिस्ता किंवा हिरवा रंग केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन कुटुंबावर धन-संपत्तीचा वर्षाव करतात, असे म्हटले जाते.


घराच्या बेडरूममध्ये गुलाबी रंग 
घराच्या बेडरूमचा विचार केला  तर आपण त्यात गुलाबी आणि आकाशी निळा रंग वापरू शकता. हे दोन्ही रंग सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात. वास्तूनुसार घराच्या आग्नेय दिशेला पिवळा, गुलाबी किंवा भगवा रंग करने शुभ मानले जाते. ही दिशा अग्नीशी संबंधित असल्याचे मानले जाते. त्यामुळे या दिशेला केवळ अग्नीशी संबंधित रंगच रंगवावेत.


घराच्या मंदिराच्या ठिकाणी हलका पिवळा रंग शुभ असतो
घराच्या मंदिरात हलका गुलाबी, हलका पिवळा, पांढरा किंवा आकाशी निळा रंग करणे चांगले मानले जाते. दुसरीकडे, घराच्या छतासाठी पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)