मुंबई : आपल्या आवडीचं घर मिळणं ही प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठी इच्छा असते. त्यासाठी तो त्याच्या भिंतींवर विविध प्रकारची रंगरंगोटीही करून घेतो. असं म्हटलं जातं की, वास्तूनुसार, घरी रंग लावल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि कुटुंबात आनंद येतो. तुम्हीही नवीन घर बांधत असाल किंवा जुनं घर रंगवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कोणता रंग योग्य असेल ते जाणून घ्या.


आकाशी निळा रंगवा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार, घरातील खोल्यांच्या रंगासाठी हलका निळा रंग योग्य मानला जातो. हा रंग तुम्ही घराच्या पश्चिम बाजूच्या भिंतीवरही लावू शकता. लक्षात ठेवा, गडद निळा रंग वापरू नका.


घराचा उत्तरेकडील भाग पाण्याशी संबंधित असल्याचं मानलं जातं. वास्तूनुसार, उत्तर दिशेच्या भिंतींवर पिस्ता किंवा हिरवा रंग लावल्यास मां लक्ष्मी खूप प्रसन्न होऊन कुटुंबावर धन-संपत्तीचा वर्षाव करतात, असं मानलं जातं.


घराच्या बेडरूममध्ये पिंक रंग


जर आपण घराच्या बेडरूमबद्दल बोलत असू तर, आपण त्यात गुलाबी आणि आकाशी निळे रंग वापरू शकता. हे दोन्ही रंग सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवतात.


वास्तूनुसार, घराच्या आग्नेय दिशेला पिवळा, गुलाबी किंवा भगवा रंग लावणं शुभ मानलं जातं. ही दिशा अग्नीशी संबंधित असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या दिशेला केवळ अग्नीशी संबंधित रंगच रंगवावेत.


मंदिराला हलका पिवळा रंग मानला जातो शुभ


घराच्या मंदिरात हलका गुलाबी, हलका पिवळा, पांढरा किंवा आकाशी निळा रंग देणं चांगलं मानलं जातं. दुसरीकडे, घराच्या छतासाठी पांढरा रंग सर्वोत्तम मानला जातो.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)