Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे. असं म्हटलं जातं की या दिवशी जरा का तुम्ही नव्या चपला किंवा शूज खरेदी केलेत किंवा घातल्यात तर तुम्हाला त्याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. वास्तू आणि जोतिष शास्त्रात शुक्रवारी आणि शनिवारी नव्या चपला खरेदी करणं आणि घालणं अशुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया या दिवशी नव्या चपला घातल्या किंवा खरेदी केल्या तर त्याचा तुमच्या आयुष्यात काय परिणाम होऊ शकतो. (
Vastu Tips avoiding buying new shoes and sandals on saturday heres know why)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी पात्रदाणे म्हणजेच शूज आणि चपला खरेदी करणं अशुभ मानले जाते. वास्तूशास्त्रात, काही गोष्टी काही दिवशी खरेदी करण्यास मनाई आहे. त्यात अमावस्या, मंगळवार, शनिवार आणि ग्रहणाच्या दिवशी चपला खरेदी करणं अशुभ असते त्यानं अनेक समस्या वाढू शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचबरोबर वडिलधारी माणसं आपल्या बऱ्याच गोष्टींना विरोध करतात त्यांच्यामुळे आपली कामं थांबतात, रखडतात. आपण करत असलेल्या खरेदीशी त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर सगळ्या सुरळीत असणाऱ्या गोष्टीही विस्कटू शकतात. 


शनिवारी नव्या चपला का खरेदी करू नयेत? 


शनिवारी नव्या चपला खरेदी न करण्याच्या आणि घालण्याच्या मागे कारण आहे. जेव्हा तुम्ही शनिवारी पात्रदाणे विकत घेतात त्यांना शनिदोष येतो त्याचसोबत यावेळी शनिदेव क्रोधित होतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी वाढतात. त्यातून ज्यांना शनीची साडेसाती आहे त्यांनी विशेष करून या दिवशी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमच्या आयुष्यात विपरित परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी विशेष करून काळजी घेतली पाहिजे. 


कसे कराल उपाय? 


  • शनिवारच्या ऐवजी शुक्रवारी नव्या चपला आणि शूज विकत घेण्याचा सल्ला दिला जातो. 

  • ज्या लोकांना साडेसाती आहे त्यांनी शनिवारी चुकूनही शूज आणि चपला घालू नयेत. 

  • फाटलेले शूज, चपला यादिवशी घालू नका. 

  • कोणत्याही शुभकार्याच्या वेळी स्वच्छ चपला आणि शूज घालावेत. 

  • ज्या पलंगावर तुम्ही झोपता त्या पलंगाच्या खाली चपला किंवा शूज अजिबातच ठेवू नये. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)