How to remove vastu defects : वास्तू शास्त्राची परंपरा अनेक दशकांपासून पाहायला मिळत आहे. आनंदाचा मार्गच जणू या माध्यमातून जात आहे. अशा या वास्तूशास्त्रामध्ये काही महतत्वपूर्ण गोष्टींची नोंद करण्यात आली आहे, जे पाहून तुम्हालाही फार सोप्या पद्धतीनं कुटुंबात आनंदाची बरसात करण्यासाठी सक्षम होऊ शकाल. (Vastu Tips bedroom is in front of kitchen is beneficial read details)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(Vastu shahstra at home) घरामध्ये वास्तू शास्त्र महत्त्वाचं का? 
प्राचीन भारतीय ज्ञान आणि विज्ञान यांना आपल्या कक्षेत ठेवत आणि वास्तू शास्त्राच्या नियमानुसार घर सजवल्यामुळं नकारात्मक उर्जेचा नाश होतो. परिणामी घर घेताना त्यामध्ये वास्तूशास्त्राचे नियमही अंदाजात घेतले जातात. 


अधिक वाचा : ऑक्टोबरमध्ये तूळ राशीत सूर्यग्रहण आणि ग्रहांचा विचित्र योग, या 6 राशींना होणार यातना!


तज्ज्ञांच्या मते घराचं स्वयंपाकघर (Kitchen) आणि बेडरुम (Bedroom) ही दोन महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्यामुळं किचनच्या समोर कधीच बेडरूम बनवू नये. असं केल्यास घरात वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. 


Kitchen समोर बेडरूम असल्यास करा 'हे' उपाय...
तुमच्या घरात जर बेडरूम आणि किचन समोरासमोर आहेत तर, हा वास्तूदोष दूर करण्यासाठी किचनमध्ये एक दरवाजा असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. किचनमध्ये काम करताना आणि काम संपल्यानंतर लगेचच तो दरवाजा बंद करा. किचन लहान आहे आणि दरवाजा लावणं शक्य नाही तर अशा परिस्थितीत तुमच्या बेडरूमचा दरवाजा बंद ठेवा. 


विंड चाइम्स करतील कमाल (Wind Chimes)
कोणत्याही कारणानं तुम्ही बेडरुमचाही दरवाजा बंद करु शकत नाही आहात तर घाबरुन जाऊ नका. घराची रचना बदलून, तोडफोड करुन वास्तूदोष दूर करणं हा काही पर्याय नाही. अशा परिस्थितीत किचन आणि बेडरुमला जोडणाऱ्या छताच्या सिलिंगला एक विंड चाईम लटकवा. 


काय काळजी घ्यावी? 
लक्षात घ्या, की विंड चाईम्स जास्त जड नसतील. त्याममध्ये हृदय किंवा डॉल्फिनचा आकार तयार झालेला असेल. त्यामध्ये सम संख्यां  जसे,  4, 6 किंवा 8 असे आकडे आहेत. विंड चाईम्स वास्तू दोष दूर करण्यासाठी फार मदत करतात.