vastu tips 2023 : फक्त `या` वस्तु घरात आणि office मध्ये ठेवा; इतकी भरभराट होईल की पैसे मोजून थकाल
Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील.
Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील. परंतु वास्तुशास्त्रात (vastu tips) सांगितल्यानुसार आपण अनेक गोष्टी या नव्या वर्षात करू शकतो आणि आपली भरभराट करू घेऊन शकता. तेव्हा या लेखात आपण जाणून घेऊया की येत्या वर्षात वास्तु शास्त्रानुसार तुम्ही जर या काही गोष्टी आवर्जून केल्यात तर तुमच्या घरात चांगली भरभराट होऊ शकते. तेव्हा जाणून घेऊया काही टिप्स. पुढच्या वर्षी महागाईची समस्याही आपल्या ठायी राहणारच आहे. त्याचसोबत आपल्याला पुढल्या वर्षी मंदीलाही (recession) समोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आपल्या खर्चही जपून करायचा आहे. अशा परिस्थितीत आपल्याला आपल्या पैशांची बचतही करायची आहे. तेव्हा 2023 हे वर्ष आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. येत्या वर्षी आपल्या घरात सुख - समृद्धीसोबतच आर्थिक चणचणीचा प्रश्नही दूर करायचा असेल तर या काही गोष्टी आपल्या मनापासून कराव्या लागतील. (vastu tips: follow this vastu tips for new year 2023 will overcome your financial problems)
तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर ही गोष्ट लावा.
वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष 2023 मध्ये तुम्ही आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या वर घोड्याची नाळ लावा. घोड्याच्या बुटामुळे नकारात्मक उर्जा घरात प्रवेश करत नाही तर याउलट एक सकारात्मक उर्जा घरात येते. यासोबतच सौभाग्य आणि शुभाचे हे घोड्याची नाळ प्रतीक आहे ज्यात कुटुंबातील सदस्यांची चांगली प्रगती होते आणि कुटुंबात भांडणतंडे राहत नाही.
व्यवसायात आणि कामात समृद्धी हवी असेल तर ही गोष्ट लावा.
येत्या नव्या वर्षात जर का तुम्हाला चांगली भरभराट हवी असेल तर घरात आरसा लावा. यामुळे तुम्हाला दुप्पट फायदा होऊ शकतो. तुम्ही पाहता की रेस्टॉरंट, चहा-कॉफी आणि कोल्ड ड्रिंकची दुकानं या बिझनेस करणाऱ्यांच्या दुकानात आरसा लावलेला असतो. आरसा लावल्यानं तुम्हाला तुमच्या व्यवसायात आर्थिक यश मिळू शकते. हे तुम्ही पाहिलेच असेल. यातून तुम्ही तुमच्या आयुष्यात किती व्यस्त आहात याचेच हे प्रतीक आहे. घरात आणि ऑफिसमध्ये आरसा लावणे हे शुभ आणि समृद्धीचे मानले जाते.
बांबू (bamboo) तुमच्या घरातील नकारात्मक उर्जा दूर करते
व्यवसायात, नोकरीत आणि तुमच्या घरात सुख - समृद्धी नांदवायची असेल तर तुमच्या घरात बांबूचे रोप लावा. बांबूला समृद्धी आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते तसेच ते तुमच्या सभोवतालची नकारात्मक उर्जाही दूर करते. वास्तुदोष असल्यास हे रोपं तुम्ही घराच्या ड्रॉईंग रूममध्ये किंवा किचनमध्ये ठेवू शकता. असं केल्यास तुम्ही आयुष्यात सुख-समृद्धी तर येईलच पण त्याचसोबत तुम्हाला धनलाभही होईल.
विंड चाईम (wind chimes) लावा आणि समृद्धी मिळवा
लहान सहान घंटा ज्या झुंडीला लटकलेल्या असतात त्यांना विंड चाईम्स म्हणतात. हे अनेक लोकं घरात आणि त्यांच्या कार्यालयात लावतात. असं केल्यानं नकारात्मक उर्जा तर दूर होतेच पण त्याचसोबत तुमची भरभराटही होते. घराच्या आणि कार्यालयाच्या ठिकाणी मुख्य दरवाजा, खिडक्या अशा ठिकाणी ते तुम्ही टांगू शकता. असं केल्यानं वातावरण आनंदी राहते. त्याचसोबत कामाच्या ठिकाणी शांती आणि समृद्धी रहाते.
लाफिंग बुद्धा (laughing buddha) ठेवा.
तुम्हाला आपलं येणारं वर्ष आनंददायी बनवायचे असेल तर तुमच्या घरी तुमच्या शोकेसमध्ये ठेवायला लाफिंग बुद्धा आणा. घराच्या ड्रॉईंग रूममध्ये दाराकडे ते तिरपे ठेवा. लाफिंग बुद्धा हे संपत्तीची देवता मानले जाते आणि हे समृद्धीचे प्रतीक आहे. 2023 तुमचे उत्पन्न वाढवायचे असले तर तुम्ही तुमच्या कार्यालयातही हे ठेवू शकता. यामुळे तुमच्या मार्गातील आर्थिक अडथळे तर दूर होतातच पण त्याचसोबत तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील.
फिश बॉऊल (fish bowl) ठेवा
जर तुम्हाला 2023 हे वर्ष शुभ आणि लाभदायक बनवायचे असेल तर घरी फिश एक्वेरियम किंवा फिश बाऊल ठेवा. फेंगशुई शास्त्रानुसार हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्याचसोबत तुमचे आर्थिक प्रश्नही सोडवते. तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार असेल तर ती दूर होते. यामुळे घरात आनंदाचे वातावरण टिकून मानसिक शांती मिळते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)