Vastu Tips for Ganesh Idol at Home: आपल्या सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa) आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2022) दिवशी बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून गणपती बाप्पाची पूजा केली जाते.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

31 ऑगस्टला बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी देखील सुरु झाली आहे. गणेशोत्सवातघरोघरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना (ganapati bappa pratistapana) केली जात आहे. पुढचे 10 दिवस खूप आनंदाचे असतात. अशामध्ये जर तुमच्याही घरी गणपती बाप्पाचे आगमन होणार असेल तर तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे खूपच गरजेचे आहे.


वास्तूनुसार घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा चित्र ठेवल्याने अनेक वास्तू दोष दूर होतात. यासोबतच घरात अपार सुख-समृद्धीही येते. चला तर जाणून घेऊया धन आणि समृद्धी मिळवण्यासाठी घरात गणेशाची मूर्ती कुठे ठेवल्यानंतर सर्वात शुभ असते. 


घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठेवा 


घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घरात सुख-समृद्धी राहते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणेशाची मूर्ती किंवा फोटो ठेवल्याने अनेक वास्तू दोष दूर होतात. मात्र यासाठी मूर्तीची प्रतिष्ठापना योग्य प्रकारे होणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही गणपतीला अशा प्रकारे ठेवता तर ते तुमच्या घराचे पालक बनतात.  गणेशाची मूर्ती योग्य दिशेने असावी आणि काही महत्त्वाचे नियमही पाळले पाहिजेत.


मुख्य प्रवेशद्वारावर गणेशमूर्ती बसवण्याचे नियम


वास्तुशास्त्रानुसार घर उत्तराभिमुख किंवा दक्षिणाभिमुख असेल तर मुख्य दारावर गणेशजींची मूर्ती ठेवावी. जर मुख्य दरवाजा पूर्व किंवा पश्चिम दिशेला असेल तर अशा स्थितीत गणेशाची मूर्ती ठेवू नये. असे केल्याने फायद्याऐवजी नुकसान होईल. तसेच गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची असावी. घरामध्ये उजव्या सोंडेची आणि घराच्या बाहेर डाव्या सोंडेची मूर्ती स्थापित करु शकता. पण लक्षात ठेवा की गणपतीची मूर्ती बसलेल्या स्थितीतच असावी. उभी असलेली गणपतीची मूर्ती कामाच्या ठिकाणीच ठेवावी.


गणेशमूर्ती जोडीने ठेवावे : गणेशमूर्तीचे मुख घराच्या आतील बाजूस असावे.  तुम्ही जेव्हा कधी घराच्या प्रवेश दारावर गणपतीची मूर्ती ठेवता तेव्हा याला जोडीने ठेवायला पाहिजे. ज्याचे एक तोंड प्रवेश दाराकडे असायला पाहिजे आणि दुसर्‍याच तोंड विपरित दिशेकडे असावे. अशी गणपतीची मूर्ती घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते.


चामड्याच्या वस्तू ठेवू नये : जसे गणपतीच्या मूर्ती जवळ चामड्याने बनलेल्या वस्तू ठेवू नये. कारण चामडं जनावरांपासून बनला असतो. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे चामड्याचे बेल्ट, जोडे किंवा बॅग मूर्तीपासून दूर ठेवावे.


 



(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)