मुंबई : प्रत्येक व्यक्तीला आपलं घर सर्वात सुंदर बनवण्याची इच्छा असते. यासाठी तो स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतो. परंतु कधीकधी आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी असतात ज्यांकडे आपलं लक्ष नसतं मात्र त्यांचा आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार, केवळ तुमच्या घरातीलच नाही तर आजूबाजूच्या वस्तूंचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या जीवनावरही होतो. अशा स्थितीत वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजासमोर या वस्तू ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर आणि संपत्तीवर चुकीचा परिणाम होतो.


मुख्य दरवाजासमोरील खांब


वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजासमोर खांब उभं राहणं शुभ मानलं जात नाही. असं मानलं जातं की, असं झाल्यास घरातील स्त्रीला आरोग्याच्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं.


घरासमोरील जिना


वास्तू तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, घरासमोर पायऱ्या बांधू नयेत. कारण यामुळे घरातील लोकांना आर्थिक समस्या तसंच तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात.


घराच्या मुख्य दारासमोर झाड असणं


घर खरेदी करताना किंवा घर बांधताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, घराच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर झाड नसावं. कारण वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजासमोर एखादं झाड असेल तर ते घरातील लोकांच्या सर्व कामात अडथळे निर्माण करू शकते.


घरासमोर मंदिर नसावे


असं मानलं जातं की, घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंदिर असणं अयोग्य मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार, घरासमोर मंदिर असल्‍याने कुटुंबातील सदस्‍यांच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात.


(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)