Vastu Tips for Money : बऱ्याच लोकांची समस्या आहे की कष्ट करतात, चांगले पैसे कमवतात पण त्यांच्याकडे पैसे टिकत नाही. अशा समस्यांमागे अनेक कारणे जबाबदार आहेत. घरातील किंवा दुकानातील तिजोरीत आपण मौल्यवान वस्तू आणि पैसे ठेवतात. पण वातुशास्त्रामध्ये तिजोरीबद्दल काही नियम सांगण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर या नियमाचे पालन केल्यास आपल्या मेहनतीचे फळ मिळण्यास मदत होते. पण कधी कधी जाणून बुजून किंवा नकळत आपण अशा काही चुका करतो ज्या आपल्या दुर्दैवाचे कारण ठरतात. असे मानले जाते की काही वस्तू कधीही तिजोरीजवळ ठेवू नयेत. चला या गोष्टींबद्दल जाणून घेऊया...


झाडू : तिजोरीजवळ झाडू कधीही ठेवू नये असे मानले जाते. पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवलेल्या तिजोरीजवळ झाडू ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही. असे केल्याने धनहानी होते.


वाचा : Vastu Tips: घरात या ठिकाणी घड्याळ लावणे पडू शकते महागात, कोणत्या दिशेला असावे घड्याळ? 


काळा कापड : काळ्या रंगाचे कपडे अशुभ मानले जातात. त्यामुळे घराच्या तिजोरीजवळ कधीही ठेवू नये. यासोबतच तिजोरीत ठेवलेले पैसे किंवा दागिने काळ्या कपड्यात गुंडाळून ठेवू नयेत. तसेच पैसे नेहमी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवा.  


गलिच्छ भांडी : अनेकांना उष्टी भांडी जिथे खातात तिथे सोडायची सवय असते. आम्ही तुम्हाला सांगतो की तिजोरीजवळ कधीही घाण भांडी ठेवू नका. यासोबतच तिजोरीला उष्ट हातांनी स्पर्श करू नये. असे केल्याने धनहानी होते.


 


 


 


(Disclaimer : येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)