Money Plant Tips: आजच्या काळात जवळपास प्रत्येक भारतीयच्या घरात मनी प्लांट (Money Plant news marathi) लावलेला दिसूनच येतो. काही लोकांना मनी प्लांट घरात ठेवायला आवडते तर काहींना बाहेर बागेत किंवा बाल्कनीत लावायला आवडते. घराची शोभा वाढवण्यासाठी लोक मनी प्लांट्स घरी लावतात. तसेच बहुतेक जण कार्यालयात पण मनी प्लांट (Money Plant) लावतात. मनी प्लांट्स आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात (astrology and architecture) वनस्पतींना ऊर्जेच्या आधारावर शुभ किंवा अशुभ मानले गेले आहे. यामध्ये तुळशीचे रोप (tulsi) आणि मनी प्लांट (Money Plant ) अतिशय शुभ मानले जातात. तुळशीचे रोप पूजनीय असून सुख-समृद्धी देते. दुसरीकडे, मनी प्लांटच्या नावावरून हे स्पष्ट होते की ही एक वनस्पती मानली जाते जी पैसा आकर्षित करते. म्हणूनच तुळशी आणि मनी प्लांट इत्यादींबाबत धर्म आणि वास्तुशास्त्रातही काही विशेष नियम सांगण्यात आले आहेत. 


मनी प्लांटला ही गोष्ट बांधा आणि चमत्कार बघा 
   
घरात मनी प्लांट लावल्याने कुटुंबातील सदस्यांचे उत्पन्न वाढते. प्रगतीचा मार्ग खुला होतो असे मानले जाते.  अनेकदा लोक आपल्या घरात कोणत्याही ठिकाणी मनी प्लांट ठेवतात पण ते करू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावण्यासाठी काही खास नियम सांगण्यात आले. या नियमांचे योग्य पालन केल्यास तुम्हाला फायदा होईल. पण मनी प्लांट लावताना तुम्ही काही चुका केल्या तर त्यामुळे तुमच्यावर आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. यासाठी मनी प्लांटवर लाल रंगाची रिबन किंवा रेशमी धागा बांधा. असे केल्याने तुमची झपाट्याने प्रगती होईल, पैसा मिळेल, प्रसिद्धी मिळेल तसेच आर्थिक संकट येणार नाही. नोकरी-व्यवसायाच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील.


वाचा: आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात, नेमकं काय आहे G20? 


मनी प्लांट लावताना या गोष्टी लक्षात ठेवा


- मनी प्लांट नेहमी दक्षिण दिशेला लावावा. उत्तर किंवा पूर्वेला कधीही लावू नका.
- तसेच मनी प्लांटला वाढण्यासाठी सूर्यप्रकाशाची गरज नसते. त्यामुळे मनी प्लांट कायम घराच्या आताच ठेवावे. ते घराबाहेर लावू नये. 
- प्लास्टिकच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या बाटलीत मनी प्लांट कधीही लावू नका. मनी प्लांट हिरव्या रंगाच्या काचेच्या बाटलीत किंवा मातीच्या भांड्यात लावा.
- मनी प्लांटचा वेल जमिनीवर पसरू देऊ नका, तर त्याला आधार देऊन वरच्या बाजूला ठेवा. मनी प्लांटची वाढणारी वेल प्रगती आणते.
- शुक्रवारी मनी प्लांटमध्ये कच्च्या दुधात पाणी मिसळून टाका. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन भरपूर संपत्ती प्रदान करते.



(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)