Vastu Tips:पर्समध्ये देवाचे फोटो ठेवत असाल तर सावधान... सापडाल मोठ्या अडचणीत
पर्समध्ये कोणतीही वस्तू ठेवण्याआधी करा विचार, नाही तर नाराज होईल धनाची लक्ष्मी... वॉलेट देवाचे फोटो ठेवत असाल ती व्हा सावधान...
Vastu Tips for Purse: वास्तुशास्त्रानुसार, घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीची उर्जा आणि आपण वापरत असलेल्या वस्तूंचा आपल्यावर प्रभाव पडतो. हा परिणाम चांगला आणि वाईट दोन्ही असू शकतो. त्यामुळे वास्तूच्या नियमांनुसार काही गोष्टींची निवड, वापर आणि देखभाल करावी. आपण रोज वापरत आसलेली एक गोष्ट म्हणजे पर्स. पुरुष आणि स्त्री दोघे रोज पर्सचा वापर करतात. पण पर्सचा वापर करताना काही चुका झाल्यातर त्याचे परिणाम आपल्याला भोगावा लागतात.
पर्स/वॉलेट संबंधी या चुका चुकूनही करु नका
- पर्स किंवा पाकीट कधीही फाटलेल्या अवस्थेत नसावे. पर्स खराब झाली तर लगेच बदला. फाटलेली पर्स असणे म्हणजे तुमच्या हातातील पैशाच्या तुटवड्याला आमंत्रण देणे.
- पर्समध्ये नोटा किंवा अन्य वस्तू अडचणीत ठेऊ नका. पर्समध्ये प्रत्येक गोष्ट व्यवस्थित ठेवा. पर्समध्ये नोटा एकात एक ठेवल्या तर धनाची देवी लक्ष्मीला क्रोधित करू शकतात
- जुनी बिले, टाकाऊ कागद कधीही पर्समध्ये ठेवू नका. असे केल्याने नकारात्मकता वाढते, ज्यामुळे नुकसान आणि त्रास होण्याची दाट शक्यता असते.
- पर्समध्ये चाव्या किंवा तीक्ष्ण वस्तू कधीही ठेवू नका. असे केल्याने खर्च वाढतो. पर्समध्ये लोखंडी वस्तू ठेवू नका.
- पर्समध्ये देवांचे फोटो ठेवू नये. असे केल्याने देवतांचा अपमान होतो.
- पर्समध्ये वाळलेली फुले वगैरे ठेवणेही टाळावे. या गोष्टींमुळेही नकारात्मकता निर्माण होते.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)