Vastu Tips : सुखी, समृद्ध आणि आनंदी आयुष्यासाठी आपण घरात महत्त्वाच्या दिवशी पूजा करतो. शिवाय नव्या घराचं इंटेरिअर करताना वास्तूशास्त्राचा देखील विचार करतो. वास्तूशास्त्रात घोड्याची नाल देखील लाभदायक असल्याचं सांगितलं आहे. अनेकांच्या घरात आपल्याला घोड्याची नाल लावली असल्याचं दिसून येतं. घोड्याचा नाल हे घरातील उत्तम क्षणांचं लक्षण आहे. घेड्याची नाल घरात ठेवल्याने जीवनातील अडचणी दूर होतात. (horseshoe bay)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोड्याची नाल घरात ठेवल्याने जीवनात सुख-समृद्धी येते, सकारात्मकता सर्वत्र पसरते, नकारात्मकता दूर होते. संपूर्ण कुटुंबाला रोगांपासून दूर ठेवाण्याची शक्ती घोड्याची नालमध्ये असते. (,horseshoe decor)


घोड्याची नाल काय आहे?
घोड्याच्या पायात घोड्याची नाल घातली जाते, ज्यामुळे त्यांना चालणं आणि धावणं सोपं होतं. म्हणूनच त्याला इंग्रजीत Horseshoe म्हणतात. लोखंडापासून बनवलेली ही नाल घोड्याच्या पंज्यांमध्ये बसवली जाते. घोड्याच्या नालीचे दोन प्रकार आहे, पहिला U आणि दुसरा उलट्या आकाराचा U. 


कोणत्या ठिकाणी लावल घोड्याची नाल? 
- घराच्या दाराच्या बाहेरील बाजूस घोड्याची नाल ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात शांतता आणि सकारात्मकता येते. घोड्याची नाल उत्तर-पश्चिम दरवाजाच्या चौकटीवर ठेवावी.  दरवाजाच्या चौकटीवर यू आकाराच्या घोड्याची नाल ठेवा, परंतु जर तुम्ही यू-आकाराची नाल उलटी ठेवत असाल तर त्यावर एक काच देखील ठेवावी. (horseshoe craft projects)


- व्यवसायातील प्रगतीसाठी, तुमच्या कामाच्या ठिकाणी दारात U-आकाराची नाल लावा. घोड्याची नाल यश मिळवून देतो. यामुळे पैसे येत राहतात. दुकानाबाहेर काळ्या घोड्याची नाल ठेवल्याने व्यापारात प्रगती होती.  (style horseshoe decor ideas)


- जर तुमच्या घरातील आनंदाला कोणाची नजर लागत असेल तर, काळ्या घोड्याची नाल तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरलावा. वास्तुशास्त्रानुसार काळ्या घोड्याची नाल लावल्याने शनीचा प्रकोप दूर होतो. (horseshoe art ideas)


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)