मुंबई : आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र रोप मानलं जातं. घरातील सुख आणि समृद्धीसाठी तुळशी पूजन करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत आहे. सकाळी तसंच संध्याकाळी  तुळशीची पूजा केल्याने घरात कोणतीही समस्या येत नाही, असं मानलं जातं. मात्र तुम्हाला कल्पना आहे का, घरात सकारात्मक ऊर्जा देणारी तुळस तुम्हाला भविष्यात येणाऱ्या संकटांबाबतही सतर्क करते. 


तुळस देते असा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्राप्रमाणे, तुळशीचं रोप हे सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तुळशीचे धार्मिक त्याचप्रमाणे आयुर्वेदात अनेक उपयोग आहेत. असं म्हणतात की, तुळस तुम्हाला वाईट नजरेपासून वाचवते त्याचप्रमाणे येणाऱ्या संकटांबाबत सूचित देखील करते. 


तुम्हीही कदाचित बहुतेक वेळा तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल की, आमच्याकडे तुळशीचं रोप राहत नाही. पाणी घालूनही तुळशीचं रोपं वाळून जातं. 


जर तुमच्या घरात तुळशीचं सतत सुकत असेल तर समजा घरात काहीतरी संकट येणार आहे. शास्त्राप्रमाणे, तुळस वाळणं म्हणजे घरात गरिबी, अशांतता किंवा संकटाचं वातावरण येण्याचे दाट संकेत असतात. इतकंच नव्हे तर घरावर आर्थिक संकट नेहमी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


लक्ष्मीचा वास


तुळशीच्या रोपामध्ये माता लक्ष्मी वास करते, असं मानलं जातं. घरात सुख-समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभण्यासाठी घरांमध्ये तुळशीचे रोप लावून तिची नियमित पूजा केली जाते. ज्या घरात तुळशीची पूजा केली जाते त्या घरात कधीही नकारात्मकता प्रवेश करत नाही. 


(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)