मुंबई : घर सजवण्याची आवड कोणाला नसते. आपलं घर छान आणि चांगलं दिसावं यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न करतो. लिविंग रूम, किचन तसंच बेडरूम छान दिसावे यासाठी आपण विविध शो पीसचा वापर करतो. मात्र तुम्ही खरेदी करत असलेले शो पीस योग्य आहेत का हे आधी तपासून पहा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घर सजवण्यासाठी काही वेळा तुम्ही नकळत अशा काही वस्तू खरेदी करतो. ज्याचा तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम होतो. वास्तुनुसार, अशा 3 गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या 'शो पीस' म्हणून घरात ठेवणं अशुभ मानलं जातं.


काटेरी झाडे


घरात कधीही काटेरी झाडे ठेवू नये. असं केल्याने घरातील वास्तू बिघडते आणि निगेटीव्हीटी पसरते. गुलाब, निवडुंग, किंवा इतर आकर्षक दिसणारी काटेरी झाडं ठेवणं टाळावं.


हिंसक फोटो


सर्वच सुंदर पेंटिंग्ज या घराच्या सजावटीसाठी शुभ असतात असं नाही. त्यामुळे घरामध्ये कोणतेही पेंटिंग्ज आणण्यापूर्वी लक्षात ठेवा की सिंह, वाघ, चिता या हिंसक प्राण्याचे फोटो लावू नका. त्याचप्रमाणे कोणतीही दुःखद घटना दर्शवणारे फोटो लावू नये. त्यामुळे घरात नेहमी निराशेचं वातावरण राहण्याची शक्यता असते. 


नटराजाची मूर्ती 


नटराजाची मूर्ती ही भगवान शिव यांच्या तांडव नृत्यातील नृत्यप्रकार असल्याचं म्हटलं जातं. हे नृत्य विनाशाचं मानलं जातं. त्यामुळे घरात शोपीस म्हणून कधीही ठेवू नये. असं ठेवल्याने घरात नेहमी अशांतता राहते, असं मानलं जातं.