मुंबई : आपल्या घरातील मोठी माणसं अनेक गोष्टी आपल्याला सांगतात. परंतु आपण या गोष्टी एका कानाने ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो. फार कमी गोष्टी आपण घरातल्यांच्या ऐकतो. त्यात सकाळी उठल्या उठल्या काय करावं आणि काय करु नये याबाबत देखील अनेक लोक आपल्याला सांगतात.  ते देखील आपण ऐकत नाही. परंतु तुम्हाला माहिती आहेत का, की अशा काही वास्तु टिप्स असतात, ज्यामुळे तुमचं नशीब बदलू शकतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वास्तुशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कोणत्या गोष्टी पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


या गोष्टी पाहू नका


1- वन्य प्राण्यांचे फोटो : अनेक घरांमध्ये हिंसक प्राणी किंवा वन्य प्राण्यांची फोटो असतात, जी घरात राहणाऱ्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर डोळ्यासमोर येतात. परंतु तुम्ही हे फोटो पाहू नका.


2- सावली: तुम्ही सकाळी उठल्यावर स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली पाहू नये. जर तुम्ही सूर्य पाहण्यासाठी बाहेर गेलात आणि सूर्य पूर्वेकडून उगवला असताना तुमची सावली पश्चिम दिशेला दिसली. त्यामुळे वास्तूनुसार हे राहुचे चिन्ह असल्याचे सांगितले जाते. अशा स्थितीत पश्चिमेकडे सावली पाहणे अशुभ मानले जाते.


3- खरखटी भांडी : असे म्हटले जाते की, सकाळी कधीही उठल्या उठल्या खरखटी भांडी पाहू नयेत. त्यामुळे वास्तूनुसार रात्रीच सर्व भांडी धुवावीत.


4- आरसा : सकाळी उठल्यावर कधीही आरशात पाहू नये. असे म्हणतात की सकाळी आरशात पाहून रात्रीची सर्व नकारात्मकता आरशातून आपल्याकडे पुन्हा येते.


सकाळी उठल्यावर काय करावे?


वास्तूनुसार सकाळी उठल्याबरोबर आपल्या हाताचे तळवे पाहा. हाताच्या तळव्यात घनश्याम, सरस्वती आणि लक्ष्मी वास करतात. तळहातांना कमळ म्हणतात.


तुमचे तळवे पाहिल्यानंतर देवाचे नाव घ्या आणि नंतर ते चेहऱ्यावर लावा. मग तुमच्या दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी प्रार्थना करा. यानंतर पाणी प्या आणि सूर्याकडे पाहा. जे लोक सूर्योदयापूर्वी उठतात बाहेर चंद्र देखील पाहू शकतात.