Vastu Tips : श्रावण महिन्याची सुरुवात होताच अनेकजणांचे उपवास सुरु होतात. श्रावणी सोमवारचे उपवास हे त्यापैकीच एक. श्रावणामध्ये देवांचेही देव मानल्या जाणाऱ्या शंकराची पूजा- अर्चा केली जाते. वास्तू शास्त्रामध्येही शंकराच्या भक्तीच्या आणि आराधनेच्या पद्धती आणि त्यांच्या फायद्यांचे उल्लेख करण्यात आले आहेत. (Vastu Tips shravan month lord shankar statue photo )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

योग्य पद्धतीनं शंकराची पूजा केल्यास त्यामुळं घरात सकारात्मक उर्जा, धनधान्य संपत्ती आणि सुख- शांतीचा वावर अनुभवता येतो. यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. 


- तुम्ही घरात जर शंकराती मूर्ती किंवा फोटो ठेवू इच्छिता, तर ती अशा ठिकाणी लावा जिथून सर्वांच्या नजरेस पडू शकेल. असं केल्यास घरात सकारात्मक उर्जा संचारेल. 


- एक गोष्ट लक्षात घ्या, की कधीच शंकराची रौद्र रुप असणारी मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका. अशानं घरात नकारात्मक उर्जा वाढीस लागते. 


- शंकर आणि पार्वतीची मूर्ती लावणंघी शुभसूचक मानलं जातं. वास्तूच्या नियमांमध्ये नमूद केल्यानुसार असं केल्यास देवी लक्ष्मीही प्रसन्न होते. 


- जर एखाद्या घरात सातत्यानं कलह निर्माण होत असेल, तर अशा वेळी शंकर- पार्वती यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अर्थात कार्तिकेय आणि गणपतीसह असणारा फोटो लावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. 


- ज्या ठिकाणी शंकराचा फोटो किंवा मूर्ती ठेवली जाईल त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेतली जाणं अतीव महत्त्वाचं. 


- घरात उत्तर दिशेला शंकराची मूर्ती लावा. वास्तुनियमांनुसार असं केल्यास व्यक्तीवर असणारी संकटं दूर पळतात. घरात सुखशांती नांदते. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भावर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)