South-West Direction Tips: वास्तूनुसार (Vastu Tips ) घरातील प्रत्येक दिशा महत्त्वाची असते. प्रत्येक ग्रहावर कोणत्या न कोणत्या देवतांचा वास असतो. यासाठीच वास्तुविशारदांच्या मते घरात कोणतंही सामान ठेवताना तिथं दिशांची काळजी घेतील जाणं कधीही महत्त्वाचं ठरतं. असं केल्यास याचे सकारात्मक परिणामही दिसून येतात. असं म्हणतात की, घराच्या दक्षिण- पश्चिम दिशेला राहु- केतुंचा वास असतो. (Vastu Tips South West Direction and rahu ketu)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोडक्यात या दिशांना (Directions at home) कोणतंही सामान ठेवताना काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं ठरतं. या दिशांना कोणतंही सामनान न ठेवणं उत्तम अन्यथा तुम्हाला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. 


अधिक वाचा : Akshay Navami : अक्षय नवमीला जुळून येतायत दोन विशेष योग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजेचं महत्त्व


 


वास्तुतज्ज्ञांच्या मते घरातील या दिशांना एखादी अवजड वस्तू ठेवल्यास वास्तूदोष दूर होतात. यामुळं दिशेमुळं उदभवणारे दुषित परिणाम नाहीसे होतात. या दिशेला नेमकं काय ठेवू नये हे एकदा पाहाच. 


दक्षिण - पश्चिम (South west) दिशेला नेमकं काय ठेवू नये? 
- वास्तू जाणकारांच्या मते या दिशांना पूजेचं स्थान बनवू नये. असं म्हणतात की या दिशेला देवघर केल्यास देवाच्या पुजेतही मन रमत नाही. ज्यामुळं व्यक्तीला पुजेचं फलित प्राप्त होत नाही. 


- दक्षिण पश्चिम दिशेला कधीच स्टडी रुम तयार करु नये. असं केल्यास शिक्षणात (Education) अडचणी निर्माण होतात. दीर्घकाळासाठी कोणत्याही गोष्टी लक्षात राहत नाहीत. 


- दक्षिण पश्चिम दिशेला Toilet सुद्धा नसालं. त्यामुळे कुटुंबप्रमुख आजाराच्या विळख्यात येतो. 


- वास्तू नियमांनुसार या दिशेला चुकूनही तुळशीचं (Basil) रोप ठेवू नका. असं केल्यास घरातील सकारात्मक उर्जा निघून जाईल. 


- पाहुण्यांसाठीची खोली या दिशेला बनवण्याच्या विचारात असाल, तर तसं करु नका. असं केल्यास पाहुणेच तुमच्याशी चुकीचं वागू शकतात ज्यामुळं तुमच्या अडचणी वाढू शकतात. 


(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )