मुंबई : घराची साफसफाई करणं खूप आवश्यक असतं. घरातली धूळ आणि घाण बाहेर काढण्यासाठी केरसुणी किंवा झाडू वापरली जाते. या केरसुणीला लक्ष्मीचं स्वरुप म्हटलं जातं. वास्तूमध्ये झाडूला महत्त्व खूप असतं. केरसुणीला ठेवण्याचे, घरात केरवारा करण्याचे काही नियम असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नियमा काही गोष्टी घरात शास्त्र म्हणून पाळायला हव्या. त्या पाळल्या नाहीत तर घरात दारिद्र्य, अशांतता आणि वाद होऊ शकतात. घरातील केरवार करण्याचीही योग्य वेळ असते कधीही तो करू नये. ज्यामुळे घरातील वातावरण दूषित होईल. 


संध्याकाळनंतर घरामध्ये केर काढू नये. रात्री झाडू मारणं अशुभ मानलं जातं. रात्री झाडू मारल्याने घरातील लक्ष्मी नाराज होते. नकारात्मक उर्जा घरात राहाते. पूर्ण दिवसात 4 वेळा घराचा कचरा काढायला हवा. 


सकाळी त्यानंतर संध्याकाळी आणि सूर्यास्तावेळी झाडू काढायला हवा. घराची साफसफाई शक्यतो रात्री करू नये. योग्य वेळी केरवारा करणं गरजेचं आहे. केरसुणी नेहमी पश्चिम दिशेला ठेवावी. त्याचा फायदा चांगला होतो. 


केरसुणीला लक्ष्मीचा दर्जा दिला जातो. केरसुणी नेहमी स्वच्छ जागी आणि स्वच्छ करून ठेवा. खराब केरसुणी ठेवल्याने निराशा पसरते. केरसुणीला नेहमी आडवी ठेवावी कधीच उभी ठेवू नये.