Vastu Tips : लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेला असावं? काळजी कशी घ्यावी
Vastu Tips: अनेकजण आपलं देवघर हे लाकडाचं बनवून घेतात. पण लाकडी देवघराची विशेष काळजी घ्यायला लागते. दुर्लक्ष केल्यास तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगत जाणून घ्या?
आपल्या जीवनात वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहे. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम खूप शुभ आणि सकारात्मक असतात, तर जेव्हा वास्तुशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी केल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम देखील अगदी विरुद्ध आणि नकारात्मक असतात. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात आले आहे. यामध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रकारची समस्या दूर करू शकता. तुमच्या घरात लाकडी मंदिर असल्यास कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याबद्दल आपण जाणून घेऊया.
लाकडी मंदिर घराच्या कोणत्या दिशेत असावं? या देवघराची पूजा कधी करावी? कशी करावी? याबाबत जाणून घ्या. वास्तुशास्त्रानुसार, जर पूजा केल्यास किंवा देवघर बसवलात तर तुम्हाला लाभदायी ठरेल.
मंदिर कोणत्या लाकडाचे असावे?
जर तुम्ही लाकडी मंदिर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही विशेष काळजी घ्यावी की ते गुलाबाचे लाकूड किंवा सागवान लाकडापासून बनलेले आहे. या लाकडांचा वापर करून मंदिर बांधल्यास ते खूप शुभ मानले जाते. लाकडाला ढेकणांचा प्रादुर्भाव होणार नाही याचीही काळजी घ्यावी. लाकडाला वाळवी किंवा ढेकूण लागल्यास घरामध्ये गरिबी येते.
मंदिर कोणत्या दिशेला ठेवावे?
जर तुम्ही तुमच्या घरात एखादे मंदिर उभारण्याचा विचार करत असाल तर तुम्ही त्याच्या दिशेची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मंदिर उत्तरेकडे ठेवू शकता. एवढेच नाही तर मंदिर स्थापनेसाठी पूर्व दिशाही चांगली मानली जाते.
स्वच्छतेची काळजी घ्या
जर तुम्ही मंदिराची स्थापना करणार असाल तर प्रथम त्या ठिकाणच्या स्वच्छतेची योग्य काळजी घ्या. फक्त इथेच नाही तर ज्या ठिकाणी तुम्ही मंदिराची स्थापना करत आहात, तिथे आधी गंगाजल शिंपडा. ती जागा स्वच्छ आणि पवित्र करुन घ्या.
शुभ दिवस निवडा
जर तुम्ही मंदिराची स्थापना करत असाल तर त्यासाठी शुभ दिवस निवडावा. यासाठी तुम्ही कोणत्याही ज्योतिषी किंवा तज्ज्ञाकडून सूचना घेऊ शकता. तसेच हिंदू धर्मातील साडे तीन मुहूर्तांपैकी एका मुहूर्ताचा देखील विचार करु शकता.
प्रथम कापड घाला
मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी त्या ठिकाणी लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड पसरावे याची विशेष काळजी घ्यावी. असे केल्यास देव प्रसन्न होतो आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )