मुंबई : घरातील काही गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे नसल्या तर घरात राहणाऱ्या व्यक्तींना अडचणींना सामोरं जावं लागतं. इतर वस्तूंप्रमाणे घरातील आरसा देखील वास्तुशास्त्राप्रमाणे लावला पाहिजे, असं म्हणतात. जर आरसा योग्य पद्धतीने लावलेला नसेल तर तुमच्या वैवाहित आयुष्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर जाणून घेऊया आरसा लावण्याची योग्य दिशा आणि इतर खास माहिती.


वैवाहिक जीवनात येईल अडथळा


तुम्ही झोपत असलेल्या ठिकाणी किंवा तुमच्या पलंगासमोर एखादा आरसा लावला असेल तर ती योग्य जागा नव्हे. असं असेल तर लगेच तो आरसा काढून टाका, कारण हा आरसा तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडचणी निर्माण करू शकतो. 


विशेष म्हणजे जर तुमच्या घरातील आरसा तुटलेला, फुटलेला, टोकदार, असा असेल तरीही त्याला घरात ठेऊ नये. अशा पद्धतीचा आरसा जर तुमच्या घरात असेल तर तो काढून टाकावा.


घरात या ठिकाणी लावावा आरसा


तुमच्या घरात किंवा बाथरूममध्ये आरसा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला लावा. असं मानलं जातं की, बाथरूमच्या दरवाजाच्या अगदी समोर आरसा लावल्यास अशुभ प्रभाव वाढतात. त्यामुळे आरसा योग्य दिशेला असावा याची दक्षता घ्यावी.