Vasubaras 2024 : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदचा सण...लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण आतुरतेने दिवाळीची वाट पाहत असतो. हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. दिवाळी ही पाच सणाचा सण आहे. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि भाऊबीज...अगदी सगळ्या नात्यांचा ऋणुबंधाचा हा सोहळा असतो. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे पहिली पणती ही गाय वासरासाठी लावली जाते. पण तुम्हाला माहितीये का? वसुबारस का साजरी करतात, कोणत्या गायीची पूजा केली जाते. (vasubaras 2024 date diwali Why celebrate Vasubaras mythology dos and donts on this day )


वसुबारस का साजरी करावी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राचीन काळापासून हिंदू लोक गायीला पवित्र मानत आले आहेत. गायीच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असं मानलं जातं म्हणून तिला गोमाता म्हणतात. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गो सेवा केली. श्रीकृष्णाने तर स्वत:ला गोपाल म्हणवून घेतलं. आपण अनेक प्रसंगी दान करती असतो. त्यात गोदान हे सर्वाश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे. 
ज्याचे घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. तसंच श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये पंचगव्य या अधिक भर दिला आहे. पंच म्हणजे पाच आणि गव्य म्हणजे गाय. याचा अर्थ गायीपासून पाच वस्तू म्हणजे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र याला महत्त्व आहे.


कोणत्या गायीची पूजा करावी?


वसुबारस ही आश्विन द्वादशी गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखली जाते. यादिवशी घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने सवत्स धेनुची पूजा करावी. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास ठेवतात. गावाकडे ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत, त्यांच्याकडे या दिवशी पुरणाचा नैवेद्य स्वयंपाक करतात. यादिवशी गहू आणि मगू खाऊ नये असं म्हणतात. शिवाय यादिवशी महिला बाजरीची भाकरी आणि गवारच्या शेंगांची भाजी खाऊ उपवास सोडतात. 


 


हेसुद्धा वाचा - Vasubaras 2024 : दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस कधी? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि गाय वासराचं महत्त्व


 


वसुबारस कथा 


या दिवशी काय करू नये?


गोवत्स एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत.
दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत
तळलेले आणि तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे.


या दिवशी काय करावे?


 या दिवसापासून अंगणात रांगोळी काढली जाते. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होते.
 घरी गुरे, वासरे असणार्‍यांकडे ह्या दिवशी पुरणा-वरणाचा स्वयंपाक केला जाते. त्याचा नैवेद्य दाखवला जातो.
 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)