Vat Purnima 2024 Date: हिंदू धर्मात ज्येष्ठ महिन्याची सुरुवात झाली की विवाहितांना वेध लागतात ते वटपौर्णिमा सणाचे. वटपौर्णिमेपासून सणांना सुरुवात होती. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरात होतो. सूवासिनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवतात आणि पूजा करतात. पण यंदा महिलांनी पूजा करण्यासाठी घाई होणार आहे. कारण वटपौर्णिमेला पूजा करण्यासाठी खूप कमी शुभ मुहूर्त असणार आहे. (vat purnima 21 june 2024 tithi shubh muhurat puja or pooja vidhi and sahitya list in marathi)


वटपौर्णिमा कधी आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू पंचांगानुसार वटपौर्णिमा तिथी 21 जूनला संध्याकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी सुरू होणार आहे. तर 22 जूनला सकाळी 6 वाजून 38 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 21 जूनला वटपौर्णिमा सण साजरी होणार आहे. 


वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कधी?


महिलांनो यंदा घरातील कामं नंतर करा कारण वडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त कमी वेळ असणार आहे. 21 जूनला पहाटे 5.24 मिनिटांपासून सकाळी 10.30 मिनिटांपर्यंताचा शुभ मुहूर्त आहे. पंडित आनंद पिंपळकर यांनी सांगितलं की, त्यानंतर दुपारी 12.23 वाजेपासून 2.27 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Vat Purnima 2024 : वटपौर्णिमेला पूजा करताना 'या' 3 रंगाच्या साड्या चुकूनही नेसू नका अन्यथा...


वट सावित्रीच्या पूजेसाठी लागणारं साहित्य


हळद
कुंकू
गुलाल
रांगोळी
तांब्या
ताम्हण
पळी
भांडं
पाट
गंध-अक्षता
बुक्का
फुलं
तुळस
दूर्वा
उदबत्ती
कापूर
निरांजन
विड्याची 12 पानं
कापसाची वस्त्रे
जानवं
12 सुपाऱ्या
5 फळं - आंबा, फणस, जांभूळ, कंरवंद आणि केळी 
2 नारळ
गुळ-खोबरं
बांगड्या
फणी
गळेसरी
पंचामृत
5 खारका
5 बदाम
सूताची गुंडी


वट पौर्णिमेची विधीवत पूजा कशी करावी?


आज आपण वट पौर्णिमेची विधीवत पूजा समजून घेऊयात. यासाठी बाजारात मिळणाऱ्या वटपौर्णिमेच्या प्रतिमा आणा. या प्रतिमेची पूजा करा. ब्रह्म सावित्री देवतेचं चिंतन करुन 16 उपचारांनी पूजा संपन्न करा. सुपारीच्या गणपतीची स्थापना करा. हळद कुंकू अक्षता वाहून पंचामृत स्नान विधी करा. सौभाग्य अलंकार देवीला म्हणजे वडाला अर्पण करा. हा विधी केल्याने पतीचं आयुष्य वाढतं. त्यानंतर वट वृक्षाला तीन प्रदक्षिणा करत दोर गुंडाळावा. फळं, नारळ अपर्ण करा. मुंबई आणि कोकण परिसरात फणस, आंबा, जांभूळ, कंरवंद आणि केळी या फळांना महत्त्व आहे. पण तुमच्या परिसरात जी पाच फळं मिळतात ती अपर्ण करा. त्यानंतर पाच सुवासिनींची पाच फळं आणि गव्हाने ओटी भरा. मुंबई आणि कोकण परिसरात पाच किंवा सात काळे मणी एका धाग्यात ओवून मंगळसूत्राला बांधण्याची परंपरा आजही पाळली जाते. यादिवशी उपवासालाही महत्त्व आहे. हा उपवास दुसऱ्या दिवशी 10 नंतर सोडावं.


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)