मुंबई : पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक आयुष्यासाठी वट सावित्री व्रत करतात. यावर्षी सोमवार, 30 मे रोजी वट सावित्री व्रत आहे. या दिवशी स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात. वट सावित्रीचं व्रत करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या नाही याबाबत आज माहिती घेणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वट सावित्री व्रताच्या पूजेसाठी लागणार्‍या साहित्याची व्यवस्था अगोदरच करावी. उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाहीत याची काळजी घ्या.


लग्न झालेल्या स्त्रीने त्या दिवशी साजश्रृंगार करावा. या दिवशी अखंड व्रत ठेवावं त्यामध्ये कोणतीही बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी. या दिवशी भिजवलेले चणे खावेत. 11 भिजवलेले चणे खावेत असं या दिवशी सांगितलं जातं. 


 या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा 7 वेळा गुंडाळावा. यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी. ते वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान 7 वेळा आणि जास्तीत जास्त 108 वेळा करतात.


पूजेच्या वेळी वट सावित्री व्रत कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा ऐकून व्रताचे महत्त्व कळते. तुमच्या कपड्यांमध्ये आणि मेकअपच्या वस्तूंमध्ये लाल रंग वापरा. लाल रंग हे शुभ आणि सौभाग्याचं प्रतिक मानलं जातं. 


या गोष्टी करणं टाळा
निळ्या, काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या वापरू नयेत. त्यामुळे नकारात्मक परिणाम होतो. यावेळी काळी, पांढरी किंवा निळ्या रंगाची साडी देखील परिधान करू नये. या रंगाच्या वस्तूपासून सावध राहा. 


हे व्रत पतीसाठी ठेवलं जातं. या दिवशी कोणताही व्यवहार करताना काळजी घ्या. जोडीदारासोबत वाद घालू नका. या दिवशी खोटं बोलू नका.