Rahu Venus Conjunction 2024: ज्योतिष्य शास्त्रानुसार, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. येत्या काळात शुक्र ग्रह गोचर करणार आहे. शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती आणि कला यांचा कारक मानला जातो. शुक्र 31 मार्चला मीन राशीत प्रवेश करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मीन राशीमध्ये राहु उपस्थित असल्याने अशा स्थितीत राहू आणि शुक्राचा संयोग होणार आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग काही राशींच्या लोकांसाठी लाभदायक असणार आहे. शुक्र 23 एप्रिल 2024 पर्यंत मीन राशीत राहणार आहे. तर राहू आणि शुक्राच्या संयोगामुळे कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे, ते पाहूयात


वृषभ रास (Taurus Zodiac)


या राशीमध्ये शुक्र आणि राहूचा संयोग अकराव्या घरात होणार आहे. तुम्हाला स्वतःमध्ये थोडा बदल करावा लागेल. तुम्हाला पदोन्नती किंवा पगार वाढ यासारखे काही फायदे मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणाबाबत बोलायचं झालं तर तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होणार आहेत. खूप दिवसांपासून सुरू असलेला तणाव संपणार आहे. नवीन मित्र बनू शकतात. 


मिथुन रास (Mithun Zodiac)


या राशीमध्ये दोन्ही ग्रहांचा संयोग दशम भावात होणार आहे. व्यवसाय आणि नोकरीतही नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोकही यश मिळवू शकतात. तुमच्या विचारांनी इतरांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकू शकता. व्यावसायिक जीवनात भरपूर यश मिळण्याची शक्यता आहे. सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता.


कर्क रास (Kark Zodiac)


या राशीमध्ये राहू आणि शुक्र यांचा संयोग नवव्या भावात होणार आहे. नवीन मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल, ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होणार आहे. कामानिमित्त काही सहलीला जाणार आहात. तुम्ही तीर्थयात्रेलाही जाऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत खुले होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचा वेळ चांगला जाईल. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )