Venus Moon Conjunction : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर गोचर करतो म्हणजेच एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. ग्रहांच्या गोचरचा आणि युतीचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो. नुकतंच म्हणजेच मंगळवारी 20 जून रोजी चंद्राच्या कर्क राशीत प्रवेश झाल्यामुळे कलात्मक योग तयार झाला आहे. हा योग्य शास्त्रामध्ये चांगलं फळ देणारा मानला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुळात शुक्र आधीच कर्क राशीत बसला आहे. त्यामुळे कर्क राशीत शुक्र आणि चंद्राचा संयोग झालाय ज्यामुळे कलात्मक योग तयार झालाय. कर्क राशीत शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने तयार झालेला कलात्मक योग सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव टाकेल. दरम्यान हा योग्य काही राशींच्या व्यक्तींसाठी सकारात्मक परिणाम देणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 


मेष रास


मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय लाभदायक आहे. चंद्र आणि शुक्र यांच्या युतीने तयार झालेला कलात्मक योग धन, नवीन वाहन देऊ शकतो. शिवाय तुम्हाला या काळात बरेच फायदे होणार आहेत. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकणार आहे. 


वृश्चिक रास


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा कलात्मक योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. काही लोकांचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आई-वडिलांचा सल्ला कामी येणार आहे.


मिथुन रास


मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी चंद्र आणि शुक्राची युती भरपूर लाभ देणार आहे. नोकरी-व्यवसायात लाभ होणार आहे. तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहे. जुनी कामं तुम्हाला भविष्यात लाभ देणार आहेत. आर्थिक लाभ होणार आहे. तुमची लोकप्रियता वाढणार आहे. कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते.


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )