जुलै महिन्यात 2 वेळा राशी बदल करणार शुक्र ग्रह; `या` राशींच्या व्यक्तींची होणार भरभराट
Venus Planet Transit In Cancer And Leo: ज्योतिष्य शास्त्रानुसार, पहिल्यांदा शुक्र 7 जुलै रोजी चंद्राच्या स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर त्याच महिन्यात 31 जुलै रोजी सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे.
Venus Planet Transit In Cancer And Leo: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी असे काही ग्रह आहेत, जे एका महिन्यात दोन वेळा गोचर करतात. असाच एक ग्रह म्हणजे शुक्र ग्रह. येत्या जुलै महिन्यात शुक्र ग्रह दोनदा भ्रमण करणार आहे.
ज्योतिष्य शास्त्रानुसार, पहिल्यांदा शुक्र 7 जुलै रोजी चंद्राच्या स्वतःच्या राशीत कर्क राशीत प्रवेश करणार आहे. तर त्याच महिन्यात 31 जुलै रोजी सूर्य स्वतःच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे. मार्चमध्ये शुक्राचे दोनदा राशी परिवर्तन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातंय. यावेळी काही राशींचं नशीब चमकण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशींच्या व्यक्तींना अधिक लाभ होणार आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्ही पैशांची बचत करण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळतील. नोकरीत आर्थिक लाभ होतील आणि तुम्हाला समाधान वाटेल. या काळात तुमचा संवाद सुधारेल आणि लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील.
मेष रास (Aries Zodiac)
शुक्राचं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या आणि पाचव्या भावात प्रवेश करणार आहे. यावेळी तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना या काळात चांगला नफा होऊ शकतो. तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.
तूळ रास (Tula Zodiac)
शुक्राच्या राशीतील बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतात. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरदार लोकांचे करियर मजबूत होणार आहे. विद्यार्थ्यांना यावेळी कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते. या राशीचे लोक जे नोकरी करतात त्यांना या काळात त्यांच्या मेहनतीचे नक्कीच शुभ फळ मिळतील. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)