Malavya Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळेनुसार, त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांच्या या बदलामुळे अनेक शुभ आणि अशुभ राजयोग तयार होताना दिसतात. ग्रहांच्या या राशी बदलाचा सर्व राशींवर काही ना काही परिणाम होताना दिसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुढील महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. हा मालव्य राजयोग काही राशींच्या व्यक्तींना 3 राशीच्या लोकांवर शुक्र ग्रहाची कृपा असणार आहे. यावेळी या राशींना भरपूर धनलाभ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना यावेळी फायदा होणार आहे. 


वृष रास (Taurus Zodiac)


मालव्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमचे व्यक्तिमत्व सुधारणार आहे. या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. कौटुंबिक सदस्यांसोबतच्या तुमच्या संबंधात बरीच सुधारणा होईल. तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊन व्यवसायात जे काही काम कराल त्यात यश मिळेल. भागीदारीच्या कामात तुम्हाला चांगला फायदा होईल. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार नोकरीच्या संधी मिळू शकणार आहेत. 


मकर रास (Makar Zodiac)


मालव्य राजयोग तुमच्यासाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकते. आर्थिक लाभासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणीही प्रगतीची शक्यता आहे. तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून नफा मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा मिळेल. बेरोजगार आहेत त्यांना यावेळी नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. 


कुंभ रास (Kumbh Zodiac)


मालव्य राजयोगाची निर्मिती तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. यावेळी नशीब तुम्हाला साथ देईल. यावेळी तुम्ही लहान किंवा मोठ्या सहली करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सर्व समस्या दूर होऊ शकणार आहेत. नोकरीत अपेक्षित परिणाम होतील आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा मिळाल्याचे समाधान मिळेल. वैवाहिक आणि प्रेम संबंधात गोडवा देखील दिसेल. आर्थिक स्थिती चांगली असल्यास अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )