Vikat Sankashti Chaturthi 2023 : हिंदू पंचांगनुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येत असतात. कृष्ण पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी. पण आजची चतुर्थी खूप खास आहे. कारण वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विकट संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ती आज आहे. या तिशीला गणरायाच्या एकदंत रुपाची पूजा केली जाते. असं म्हणतात की विकट संकष्टी चतुर्थी ही संकटांचा नाश करते. पण आजच्या चतुर्थीवर भाद्राची सावली आहे, असं म्हणतात. मग चला तर जाणून घ्या वैशाख संकष्टी चतुर्थीची शुभ वेळासोबत संपूर्ण माहिती. (vikat sankashti chaturthi 2023 shubh muhurat moon rising time puja vidhi significance and upay in marathi)


विकट संकष्टी चतुर्थी 2023 मुहूर्त (Vikat Sankashti Chaturthi 2023 Muhurat)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी रविवार, 09 एप्रिल 2023 रोजी सकाळी 09.35 वाजता सुरू होईल. 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08:37 वाजता संपेल. चंद्राची पूजा केल्यावरच संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होते. अशा परिस्थितीत ९ एप्रिल रोजी हे उपोषण करण्यात येणार आहे.


गणपती पूजा सकाळचा मुहूर्त - 09:13 am - 10:48 am
गणेशजींच्या पूजेची संध्याकाळची वेळ - 06.43 ते रात्री 09.33
चंद्रोदयाची वेळ - रात्री 10.02 वा
विकट संकष्टी चतुर्थी सिद्धी योग - सकाळपासून रात्री 10.14 पर्यंत
विशाखा नक्षत्र - दुपारी 2 वाजेपर्यंत 
त्यानंतर अनुराधा नक्षत्र सुरु 



विकट संकष्टी चतुर्थी 2023 भाद्र काळ (Vikat Sankashti Chaturthi 2023 Bhadra kaal time)


आजच्या विकट संकष्टी चतुर्थीवर भाद्रची सावली आहे. भाद्र काळ हा 08 एप्रिल 2023 ला रात्री 09.56 वाजता सुरू होईल आणि आज सकाळी 09.35 पर्यंत असेल. खरं तर हिंदू धर्मात भाद्र काळात कुठलही शुभ कार्य करता येतं नाही. पण लाडक्या बाप्पाची पूजा करण्यास काही हरकत नाही, असं वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचं म्हणं आहे. 


संकष्टी चतुर्थी व्रत उपासना पद्धत (Vikat Sankashti Chaturthi 2023 Puja Vidhi)


सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. 


पूजास्थानी चौरांगावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र टाकून त्यावर गणरायाची मूर्ती किंवा चित्र स्थापन करा.


गणरायाला जल, फुलं, फळं, सिंदूर, अक्षता, पान, सुपारी, धूप, दिवा, दुर्वा आणि लाडू अर्पण करा.


गणपतीसमोर तुपाचा दिवा लावा आणि 'ओम गं गणपतये नमः' या मंत्राचा जप करा.


श्रीगणेशाची आरती करून त्याला भोग अर्पण करा.


चंद्र उगवण्यापूर्वी गणपतीची पूजा करा.


पूजेनंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून मध, चंदन, रोळी मिसळून उपवास सोडावा.


हेसुद्धा वाचा - Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ



विकट संकष्टी चतुर्थीचे महत्व (Vikat Sankashti Chaturthi Significance)


ही विकट संकष्टी चतुर्थी खूप खास असते कारण यादिवशी बाप्पाची आणि चौथ मातेची पूजा केल्यास मुलांवरील सर्व अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. शिवाय वैवाहित जीवनात तणाव असल्यास आजची संकष्टीचा उपवास आणि गणरायची पूजा केली पाहिजे. अशी पण एक मान्यता आहे की, या दिवशी बाप्पाची पूजा अर्चा केल्यास कमकुवत बुद्धी असलेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढतो. शिवाय विकट चतुर्थीला चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक त्रास दूर होतो आणि कुटुंबात समृद्धी येते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)